मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी आणखी १२ जणांना अटक   

कोलकाता : पश्चिम बंगालमधील मुर्शिदााबाद येथे वक्फ (सुधारीत) विधेयकाच्या विरोधात निदर्शने झाली होती. तेव्हा हिंसाचार उफाळून आला होता. तिघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आणखी १२ जणांना पोलिसांनी रविवारी अट केली.
 
मुर्शिदाबाद मुस्लिम बहुल जिल्हा आहे. तेथे शुक्रवारी आणि शनिवारच्या हिंसाचारानंतर केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या पाठवल्या असून हिंसाचाराची नवी कोणतीही घटना घडलेली नाही  जिल्ह्यातील सुती, धुलियान, समरसेरगंज आणि जांगीपूर परिसरात शांतता आहे. रात्रभर छापे घालण्याची कारवाई सुरू होती. त्या अंतर्गत आणखी १२ जणांना अटक केली आहे. आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांना अटक केल्याची माहिती ज्येष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली. हिंसाचारग्रस्त भागांत भारतीय न्यायसंहितेच्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून इंटरनेट सेवा बंद केली आहे. प्रमुख मार्गावर वाहनांची तपासणी केली जात आहे. संवेदनशील भागांत गस्त घातली जात आहे. तपास सुरू असून आणखी काही जणांना अटक केली जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

Related Articles