अमेरिकेसोबत शुल्कविरहित व्यापार करार होणे अशक्य   

तज्ज्ञांचे मत, प्रस्तावावर चर्चा

नवी दिल्ली : अमेरिका आणि भारत यांच्यात शुल्क विरहित व्यापार करार होण्याची तूर्त चिन्हे नाहीत. मात्र, या संदर्भातील प्रस्तावावर विचार सुरू आहे.  पण, दोन्ही देशांच्या आर्थिक विकासात प्रचंड तफावत पाहता तसा व्यापार करार होण्याची सुतराम शक्यता नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.अमेरिकेच्या प्रत्युत्तर कराच्या पार्श्वभूमीवर काही व्यापार तंज्ज्ञांनी सल्ला दिला की, भारत सरकारने अमेरिकेसमोर शुल्क विरहित व्यापार कराराचा प्रस्ताव मांडावा. अमेरिका आणि युरोपीय महासंघ विकसित आणि आधुनिक देश आहेत. त्यामुळे त्यांना शुल्क विरहित व्यापार करणे शक्य आहे. या उलट भारत आणि अमेरिकेत होणारा करार एखाद्या पॅकेज प्रमाणे असेल. त्यात वस्तू आणि शुल्काचा अडथळा नसेल. मात्र, इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये शून्य कर असेल तर आपल्याला तेच धोरण राबवावे लागेल. अशा प्रकारचा करार कधीही होणे शक्य नाही आणि तो चुकीचा ठरणार आहे. 

Related Articles