भारतात तयार होणार लढाऊ विमान   

नवी दिल्ली : भारत लढाऊ विमाने बनवण्याची तयारी करत आहे. जगातील काही देशांनी आधीच चांगली लढाऊ विमाने तयार केली आहेत. यामध्ये अमेरिकेच्या एफ-३५ ची सर्वाधिक चर्चा झाली आहे. याशिवाय रशियाचे एसयू-५७ आणि अमेरिकेचे एफ-२१ देखील प्रसिद्ध आहेत.
 
भारत यापैकी एक जेट विमान खरेदी करणार आहे, अशी चर्चा होती. पण आता भारत या परदेशी विमानांपेक्षा आपल्या स्वदेशी लढाऊ विमानांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. मल्टीरोल फायटर एअरक्राफ्ट प्रकल्पांतर्गत भारताने यापूर्वी ११४ नवीन लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्लॅन केला होता. या योजनेत एफ-३५, एसयू-५७, एफ-२१, ग्रिपेन, राफेल, युरोफायटर टायफून आणि एफ-१५ इएक्स सारख्या परदेशी लढाऊ विमानांचा समावेश होता. पण ही योजना अनेक वर्षांपासून रखडली आहे. यामुळे आता परदेशी विमानांवर अवलंबून राहण्याऐवजी आपल्याच देशात बनवलेल्या विमानांमध्ये सुधारणा करण्यावर भारत   प्राधान्य देणार आहे. भारतीय हवाई दलाकडे ३१ लढाऊ स्क्वॉड्रन आहेत, तर ४२.५ स्क्वॉड्रनची आवश्यकता आहे. जुनी मिग-२१ विमाने हळूहळू काढून टाकली जात आहेत. त्यामुळे, हवाई दल मजबूत करण्यासाठी, भारत आता आपल्या स्वदेशी लढाऊ विमानांवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.
 
भारत सरकार आणि संरक्षण मंत्रालयाने ’आत्मनिर्भर भारत’ आणि ’मेक इन इंडिया’ अंतर्गत देशात शस्त्रे आणि लढाऊ विमानांच्या निर्मितीला प्राधान्य देत आहे. याअंतर्गत, भारत आता त्याच्या दोन स्वदेशी लढाऊ विमान प्रकल्पांवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. पहिला म्हणजे पाचव्या पिढीतील एएमसीए लढाऊ विमान आणि दुसरा म्हणजे चौथ्या पिढीतील तेजस एमके-२, भारतीय हवाई दल अधिक मजबूत व्हावे आणि इतर देशांवरील अवलंबित्व कमी व्हावे यासाठी सरकार या दोन्ही लढाऊ विमानांची संख्या वाढवण्याची योजना आखत आहे.

Related Articles