महामार्गांच्या आधुनिकीकरणासाठी दहा लाख कोटींची गुंतवणूक   

अमेरिकेच्या तोडीस तोड निर्मिती, ईशान्य भारताकडे लक्ष

नवी दिल्ली : देशातील महामार्गांचे आधुनिकीकरण करण्यासाठी १० लाख कोटींची गुंतवणू केली जाणार आहे. त्यात. ईशान्य भारताकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे. रस्ते, महामार्ग अमेरिकेच्या तोडीस तोड बनविणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत गडकरी म्हणाले, येत्या दोन वर्षात पायाभूत सुविधांचा विकास झपाट्याने करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. त्यामुळे देशातील रस्ते, महामार्ग अमेरिकेच्या तोडीस तोड असतील. येत्या दोन वर्षात महामार्गअधिक बळकट करण्यासाठी १० लाख कोटी रुपये खर्च केले जातील. त्यामध्ये ईशान्य भारताकडे अधिक लक्ष दिले जाईल. तेथील पायाभूत सुविधांचा विकास अधिक वेगाने करण्यावर भर दिला जाणार आहे. ईशान्य भार डोंगराळ आणि दुर्गम आहे. त्यामुळे रस्त्यांचे जाळे विणणे अवघड काम आहे. 

Related Articles