जातनिहाय जनगणनेचा निर्णय घाईत घेणार नाही   

शिवकुमार यांच्याकडून स्पष्ट

बंगळुरू : जातिनिहाय जनगणनेचा निर्णय घाईाघाईने घेतला जाणार नाही, असे कर्नाटकाचे उप मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी रविवारी सांगितले.
समाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक पाहणी अहवाल आर्थत जातनिहाय जनगणनेच्या विषयावर ते बोलत होते. या संदर्भातील अहवाल राज्य मंत्रिमंडळाला सादर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणाले, मंत्रिमंडळ अहवालावर चर्चा करणार आहे. सर्वांना सारखाच न्याय देण्यासाठी अहवालातील तरतुदीवर चर्चा करेल. अहवालावर मी बोलत आहे. मात्र, त्याचा राजकीय अर्थ काढू नये, असेही ते म्हणाले. दरम्यान, मागासवर्गीय कर्नाटक राज्य आयोगाने शुक्रवारी मंत्रिमंडळाला अहवाल सादर केला.

Related Articles