लखनौ : भूसंपादनातील अनियमितते विरोधात ८ मे रोजी प्रयागराजमध्ये पंचायत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिली. टिकैत म्हणाले, देशातील भूसंपादन हा मोठा प्रश्न आहे. त्याच्या नावावर जमिनी बळकावल्या जात आहेत. कारस्थान करून एकमेकांच्या नावावर जमिनी हस्तांतरित केल्या जात आहेत. एखाद्या व्यक्तीकडे २० एकर जमीन आहे, मात्र नाव नोंदवल्यानंतर त्यांच्या वाट्याला फक्त पाच एकरच जमीन आली. जमीन मोजमापासाठी शेतकरी कार्यालयाच्या चकरा मारत आहेत, अधिकारी, कर्मचारी शेताचे मोजमाप करत नाहीत. दुसरीकडे, जर एखाद्या व्यावसायिकाने जमीन मोजणीसाठी अर्ज केला तर त्याच्या जमिनीचे तत्काळ मोजमाप केली जाते.प्रयागराजमध्येही मोठ्या आंदोलनाची गरज आहे. जिल्ह्यातील दलित व्यक्तीची हत्या आणि मृतदेह जाळण्याचा प्रयत्न यावर बोलताना टिकैत म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. फतेहपूर येथील तीन जणांच्या हत्येप्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे.
Fans
Followers