सध्या हसण्याच्या अधिकारावरही संकट : डॉ. एस. मुरलधीरन   

नवी दिल्ली :आता हसण्यासारख्या मूलभूत अधिकारावरही बंधने आहेत. हसण्याच्या अधिकारावरही संकट घोंगावते आहे, अशी खंत ज्येष्ठ वकील आणि ओडिशा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश डॉ. एस. मुरलधीरन यांनी व्यक्त केली. एका चर्चासत्रात बोलत होते.
 
जस्टिस मुरलीधर म्हणाले, लोकशाहीचे नियम आहेत, आणि त्यांचे पालन आपल्या सगळ्यांनाच केले पाहिजे. पण तुम्ही जर तुमच्या अधिकारांचा उपयोग केला नाही, तर तुम्ही विसरुन जाल, की तुमच्याकडे हा अधिकार आहे. उदाहरणार्थ हसण्याचा अधिकार, हसणे हा तुमचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, आजच्या घडीला हसण्याच्या या अधिकारावरही संकट घोंगावत आहे. माणूस हा एकमेव असा प्राणी जो बुद्धी, हास्य, माध्यमातून आनंद मिळवणे या सगळे माणूस करु शकतो. हसणे हे अतिशय स्वाभाविक आहे. हसण्याचा अधिकार तरी आमच्याकडून हिरावून घेऊ नका. आपल्या सगळ्यांकडे मनसोक्त आणि मनमुराद हसण्याची क्षमताही असू शकते.
 
मुरलीधर यांचे वक्तव्य हे अशा वेळी समोर आले आहे. सध्या कुणाल कामराचे प्रकरण चर्चेत आहे. कुणाल कामराने काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवणारे एक गाणे एका कॉमेडी शोमध्ये गायले होते. हा विषय अधिवेशनातही हा विषय गाजला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अशा प्रकारे बदनामी सहन करणार नाही असे सांगितले. विरोधक विरुद्ध सत्ताधारी असा सामना बघायला मिळाला. त्याचवेळी देशाच्या एका न्यायालयातील माजी चीफ जस्टिस मुरलीधर यांनी हसण्यासारख्या मूलभूत गोष्टीवर बंधने असल्याची बाब नमूद केली आहे.

Related Articles