भाजपने उत्तर प्रदेशला अराजकतेच्या युगात ढकलले : अखिलेश   

लखनौ : उत्तर प्रदेशातील भाजप सरकारकडून गुन्हेगारांना संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून, भाजप सरकारने राज्याला अराजकतेच्या युगात ढकलले आहे, असे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सांगितले. 
 
अखिलेश म्हणाले,  राज्याने एवढी अराजकता कधीच पाहिली नाही. कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे. गुन्हेगार मोकळे फिरत आहेत, रस्त्यावर शस्त्रे दाखवत आहेत आणि जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. आग्र्यापासून वाराणसीपर्यंत अराजक घटकांनी सत्ताधारी पक्षाच्या संरक्षणाखाली दंगली घडवून आणल्या आहेत. सत्तेत असलेल्यांच्या दबावाखाली पोलिस हतबल आहेत. गरीब, मागासवर्गीय, दलित आणि अल्पसंख्याकांचा आवाज दाबण्यासाठी सरंजामशाही शक्तींना प्रोत्साहन दिले जात आहे.यादव यांनी वाराणसी येथे बनारस-वाले मिश्रा जी म्हणून ओळखले जाणारे समाजवादी पक्षाचे एक मुखर नेते हरीश मिश्रा यांच्यावरील कथित हल्ल्याचाही निषेध केला. ते म्हणाले, मिश्रा यांचे रक्ताने माखलेले कपडे हे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळलेल्या यंत्रणेची भयानक आठवण आहे. 

Related Articles