शेतकर्‍यांना दिवसा दहा तास वीज पुरवठा   

फडणवीस यांची घोषणा; वीजबीलही कमी होणार 

वर्धा : राज्यातील शेतकर्‍यांना दिवसा १० तास वीज देेण्यात येईल. सौरउर्जेद्वारे ही सुविधा उपलब्ध केली जाईल. तसेच दरवर्षी विजेचे बिल कमी होणार आहे. वीज बिलाचे दर कमी करणारे महाराष्ट्र देशात पहिले राज्य ठरले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  
   
वर्धा जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना फडणवीस यांनी आर्वी येथे शेतकर्‍यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ८० टक्के महाराष्ट्रात आता लवकरच दिवसा १० तास वीज उपलब्ध करून दिली जाईल. पाण्याची पातळी वाढण्यासाठी शेतकर्‍यांनी विहीर फेरभरण योजना हातात घ्यावी. आपण जर असाच उपसा करीत राहिलो तर आपलाही प्रदेश वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवराजसिंह चौहान यांनी प्रत्येकाला घर देण्यासाठी पाऊल उचलले आहे. घराकरिता २ लाख रुपये मिळतील हा निर्णय केला आहे, प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रत्येक घरावर सोलर लागेल. त्यामुळे नागरिकांना मोफत वीज मिळेल. दरम्यान, दाओस येथील दौर्‍यानंतर जवळपास ७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक वर्ध्यात करण्यात आली आहे. रोजगार उपलब्ध करून देण्यावरही  शासनाचा भर आहे, असेही फडणवीस म्हणाले. 

Related Articles