पुणे जिल्ह्यातील १२ रेल्वे स्थानकांचे रुप पालटणार   

पुणे : भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून, प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील १२ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.या योजनेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर (मध्य आणि पश्चिम) अंधेरी, टिळक टर्मिनस, पुणे, नाशिक रोड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली आदि महत्त्वांच्या स्थानकांचा समावेश आहे. याशिवाय उपनगरीय आणि ग्रामीण भागातील अनेक स्थानकांनाही यामध्ये स्थान देण्यात आले आहे.
 
या पुर्नविकासात पुणे जंक्शन, शिवाजीनगर स्टेशन, लोणावळा स्टेशनसह ९ स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये बारामती स्टेशन ११ कोटी ४० लाख, दौंड-४४ कोटी, केडगाव-१२ कोटी ५० लाख, आकुर्डी- ३४ कोटी, चिंचवड-२० कोटी ४० लाख, देहूरोड स्टेशन- ८ कोटी ५ लाख, तळेगाव स्टेशन-४० कोटी ३४ लाख, हडपसर स्टेशन-२५ कोटी, उरुळी स्टेशनच्या विकासासाठी १३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाउंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्टस्, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच स्थानकांचे सौदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे. 

Related Articles