लग्नाच्या आमिषाने महिला डॉक्टरवर बलात्कार   

आयपीएस अधिकार्‍यावर गुन्हा  

नागपूर : एका महिला डॉक्टरला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी आयपीएस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.२८ वर्षांच्या महिला डॉक्टरने नागपुरातील इमामवाडा पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली.पीडित डॉक्टर आणि ३० वर्षांचा आयपीएस अधिकारी नोव्हेंबर २०२२ मध्ये समाजमाध्यमावरील अ‍ॅपच्या माध्यमातून संपर्कात आले होते. आरोपी तेव्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होता, तर पीडिता एमबीबीएसचा अभ्यासक्रम करत होती. त्यांचे ऑनलाइन संभाषण लवकरच फोन कॉल्समध्ये बदलले. त्यांची मैत्री झाल्यानंतर आरोपीने महिलेशी लग्न करण्याचे वचन दिले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्यानंतर आरोपीने महिलेला टाळण्यास सुरुवात केली आणि तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. तिच्या तक्रारीच्या आधारे शनिवारी आयपीएस अधिकार्‍याविरुद्ध बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. 

Related Articles