शार्दुल ठाकूरचे आयपीएलमध्ये २०० बळी   

लखनौ : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात अनसोल्ड राहिल्यावर वाइल्ड कार्डसह आयपीएलमध्ये एन्ट्री करणारा शार्दुल ठाकूर सातत्याने आपल्या कामगिरीतील धमक दाखवून देताना दिसतो.  इंज्युरी रिप्लेसमेंच्या रुपात लखनौच्या ताफ्यातून मिळालेल्या संधीच त्याने सोन करून दाखवले आहे. प्रत्येक मॅचमध्ये त्याने आपल्या गोलंदाजीची खास छाप सोडल्याचे पाहायला मिळाले. 
 
लखनौच्या मैदानात रंगलेल्या गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना त्याच्यासाठी एकदम खास होता. आयपीएलच्या हंगामातील २६ सामन्यात तो शंभरावा आयपीएल सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. या सामन्यात २ बळी घेत त्याने द्विशतकी डाव शाधला आहे. पहिल्या तीन षटकामध्ये त्याला एकही बळी मिळाला नव्हता. पण अखेरच्या षटकात त्याने २ महत्वपुर्ण बळी घेत टी-२० क्रिकेटमध्ये २०० फलंदाज बाद करण्याचा पल्ला गाठला. 
 
गुजरात विरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात शार्दुल ठाकूरने शेरफेन रुदरफोर्डच्या रुपात आपली पहिला बळी टिपला.  त्यानंतर दुसर्‍या चेंडूवर त्याने राहुल तेवतियाला तंबूचा रस्ता दाखवत टी-२० क्रिकेटमध्ये २०० बळी पूर्ण केल्या. या सामन्यात दोन चेंडूवर दोन बळी घेत तो हॅटट्रिकवर पोहचला होता. पण त्याची संधी हुकली. राशीद खान झेलबाद होता होता वाचला अन् त्याच्या हॅटट्रिकची संधी हुकली.
 
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यातील २ बळींसह  शार्दुल ठाकूरच्या खात्यात आता ११ बळी जमा झाल्या आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो दुसर्‍या स्थानावर आहे. रंजक गोष्ट ही की, आयपीएलमध्ये आतापर्यंत घेतलेल्या ११ बळींमध्ये ४ बळी त्याने फुलटॉस चेंडूवर घेतल्या आहेत.  अन्य कोणत्याही गोलंदाजाला फुलटॉसवर एक पेक्षा अधिक बळी मिळालेला नाही. 

Related Articles