E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
डॉ. आंबेडकरांचे स्मरण करताना...
Wrutuja pandharpure
14 Apr 2025
प्रा. शीला गाढे
आज १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताना देशाने त्यांच्या विचारांवर नव्याने विचार करण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. देश स्वतंत्र झाल्यानंतर बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या राज्यघटनेनुसार कारभार सुरू झाला; मात्र कालौघात काही समस्यांचे स्वरुप आणखी गंभीर झाले. समस्या वाढल्या. हा गुंता सोडवण्यासाठी पुन्हा एकदा त्यांचे विचार अभ्यासण्याखेरीज पर्याय नाही.
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज (१४ एप्रिल) जयंती. त्यानिमित्त...
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीदिन. या निमित्ताने त्यांचे स्मरण करताना अनेक गोष्टी जाणवतात. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या राज्यघटनानिशी देशाचा कारभार सुरू झाला. आज या घटनेला बराच काळ लोटला आहे. देश अनेक पातळ्यांवर पुढे गेला आहे. तरीदेखील अनेक प्रश्न ‘जैसे थे’ अवस्थेतच दिसतात. घटनेचे पालन करण्यावर कमी, तर त्यावर संक्रांत आणली जात असल्याच्या आशंकेचीच जास्त चर्चा होते. देशातील मजबूत लोकशाहीभोवती शंकेचे असे वलय असणे नक्कीच अयोग्य आहे. म्हणूनच बाबासाहेबांचे स्मरण करताना त्यांच्या मार्गदर्शनानुसार वर्तमान घडवण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. कारण हा विचारच देशाला योग्य दिशा दाखवू शकतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजातील सर्व वर्गांना समानता आणि न्याय मिळवून देण्यासाठी लढले. त्यांनी दिलेल्या आरक्षणाच्या संकल्पनेमुळेच आज मागास वर्ग शिक्षण, रोजगार आणि समाजातील इतर क्षेत्रांमध्ये स्थान मिळवू शकला. आजच्या पिढीला बाबासाहेबांच्या या संकल्पनेची गरज आहे, कारण समाजात अजूनही असमानता आणि भेदभावाच्या विषवल्ली आहेत. खेरीज बाबासाहेबांनी नेहमीच शिक्षणाला प्राधान्य दिले. त्यांचे संपूर्ण जीवनच याचे उदाहरण आहे. त्यांच्या कामामुळे, भारतीय समाजात शिक्षणाच्या प्रसाराला नवी दिशा मिळाली. तेव्हा आजच्या पिढीला बाबासाहेबांच्या शिक्षणाच्या महत्त्वाकांक्षेचा आदर्शही घ्यायला हवा.
डॉ. आंबेडकर यांनी भारतीय घटना तयार केली, जी आजही समानतेचे, हक्कांचे आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. तेव्हा घटनेचे पालन करणे आणि त्याची माहिती असण्याची गरज प्रत्येक नागरिकाने ओळखायला हवी. त्यांनी जीवनभर समाजातील वाईट प्रथा, जातीभेद आणि पिळवणुकीविरोधात संघर्ष केला; मात्र यासंबंधीच्या समस्या आजही सुटलेल्या नाहीत. समाजाने बाबासाहेबांच्या कार्याचा आदर्श घेतल्यासच आपण एक समतोल आणि आदर्श समाज निर्माण करू शकतो. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला त्यांचे विचार बाणवून अमलात आणणे योग्य ठरेल. त्यांच्या कार्यप्रेरणेतून आपण सर्वांगीण सामाजिक बदल घडवू शकतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ सामाजिक सुधारक नव्हते, तर त्यांनी आर्थिक विषमतेवरही भाष्य केले. आर्थिक समानता हीच खर्या सामाजिक बदलाची गुरुकिल्ली आहे, असे त्यांचे मत होते. सध्या त्यांच्या या विचारांचा वापर आर्थिक धोरणे आणि शोषणविरोधातील लढ्यांमध्ये होतो. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मातील असमानता आणि शोषणाला विरोध करत बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी धर्माच्या बाबतीत स्वतंत्रता, समानता, बंधुता ही तत्वे मार्गदर्शक म्हणून स्वीकारली. लाखो लोकांनाही धर्मांतर करण्याची प्रेरणा मिळाली. डॉ. आंबेडकर यांनी महिलांच्या हक्कासाठी देखील लढा दिला. त्यांच्या कार्यामुळे महिलांना आरोग्य, शिक्षा आणि समान अधिकार मिळवण्यासाठी अधिक संधी प्राप्त झाल्या. प्रसिद्ध वकील असल्यामुळे ते कायम महिलांच्या हक्कांवर काम करत राहिले. डॉ. आंबेडकर हे राजकीय जागरूकतेचे प्रबल समर्थक होते. राजकारण हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांचे मत होते. त्यांच्या विचारांमुळे आजही दलित आणि मागासवर्गीय लोक राजकारणात सक्रिय होण्याचे प्रयत्न करताना दिसतात. यादृष्टीनेही त्यांचे विचार आजही प्रभावी असल्याचे
दिसून येते.
मौलिक विचार
देशाबद्दल त्यांनी व्यक्त केलेले विचार आजही मोलाचे आहेत. ते असे की, ‘वर्षातले चार महिने शेतकरी बेरोजगार असतो. हे लक्षात घेऊन शेतकर्यांसाठी पूरक उद्योग निर्माण होण्याची आवश्यकता आहे.’ परंतु बाबासाहेबांच्या या शिकवणीकडे तेव्हापासून आजतागायत म्हणावे तसे लक्ष देण्यात आले नाही. आजही अनेक तज्ज्ञ शेतीला पूरक उद्योग निर्माण करण्यावर भर द्यावा, असा आग्रह धरत आहेत. यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीची कल्पना येते. सद्यस्थितीत सगळ्यांनी डॉ. आंबेडकरांचे सामाजिक न्यायाचे तत्त्व अंगिकारणे महत्त्वाचे ठरणार आहे. तरच सगळ्या समाजाला विकासाच्या समान संधी प्राप्त होतील आणि संपूर्ण समाजाची विकासाकडे वेगाने वाटचाल होऊ शकेल. त्यातून देशाच्या संपूर्ण विकासाचे स्वप्न पूर्ण होणे शक्य होईल.
आजही देशातली गरिबी, दारिद्र्य कमी करण्याचे आव्हान कायम आहे. अशा परिस्थितीत दारिद्र्य निर्मूलनाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेणे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. बेकारी, गरिबी याविरूद्धचा लढा हे देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे मुख्य सूत्र होते. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदी असताना देशातल्या बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, सावकारी रद्द केली. सामान्य जनतेला याचा फायदा झाला. तसा काही कार्यक्रम आज राबवला जाणार का, हाही खरा प्रश्न आहे. आज बँकिंग व्यवस्थेचा लाभ केवळ धनदांडग्यांनाच होताना दिसत आहे. यातल्या काही मंडळींकडे असणारी कोट्यवधीची कर्जं थकबाकी विचार करायला लावणारी आहे. काही कोटींची थकबाकी ठेवून, बँका डबघाईला आणून देशाबाहेर पळून गेलेले धनदांडगेही आपल्याला ज्ञात आहेत. त्यांच्या हस्तांतरणाचे प्रश्न किचकट आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे रखडलेले आहेत. हे सगळे लक्षात घेता सामान्यांना दिलासा देणारी बँकिंग व्यवस्था घडवण्याचे आव्हानही सत्ताधिशांपुढे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या भारतीय राज्यघटनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ही राज्यघटना सादर करताना बाबासाहेबांनी एक इशारा दिला होता. ते म्हणाले होते, ‘आज आपण एका विसंगत जगात प्रवेश करत आहोत. एका बाजूला राजकीय समता प्रस्थापित होत असताना दुसरीकडे सामाजिक विषमता तशीच कायम आहे. अशा वेळी ही राज्यघटना नीट राबवली गेली नाही, तर घटनेचा डोलारा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.’
भारताच्या राजकीय स्थैर्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या दोन देणग्या प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या. पहिली देणगी आहे लोकशाहीतल्या विविध यंत्रणांचे अधिकार आणि त्यांचे परस्परांवरील नियंत्रण. संसद, न्यायपालिका आणि कार्यपालिका या तिघांचे परस्परसंबंध कसे असावेत हे डॉ. आंबेडकरांनी मोठ्या परिपक्व पद्धतीने निश्चित केले. त्याशिवाय देशाच्या कारभारावर कमी-जास्त प्रमाणात नियंत्रण ठेवणार्या महालेखापाल, निवडणूक आयुक्त अशा यंत्रणाही निर्माण केल्या. लष्कर हा देशातला महत्त्वाचा घटक आहेच; परंतु या सर्वांच्या संबंधामध्ये समतोल निर्माण करण्यासाठी त्यांच्या अधिकारांसंबंधीचे नियम अतिशय काटेकोरपणे तयार केले. त्यातल्या प्रत्येकाला स्वायत्त अधिकार राबवण्याची मुभा दिली; परंतु त्यातला कोणताही घटक आपल्या स्वायत्त अधिकारामध्ये एकाधिकार गाजवू शकणार नाही, अशीही नियंत्रणे ठेवली. त्यामुळेच आपली ही लोकशाही स्थिर
झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने लोकशाहीचे सामाजिकीकरण हा मुद्दाही विचारात घेण्यासारखा आहे. अलीकडे देशात जातीय, धार्मिक अस्मिता अधिक घट्ट होऊ लागल्या आहेत. एखाद्या गोष्टीचा फायदा आपल्या जातीबांधवांना वा धर्मबांधवांनाच व्हावा, असा आग्रह धरला जात असून त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आरक्षणावरून वादळ उठत आहे. शेतकर्यांच्या आत्महत्त्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. असंघटित कामगारांचा प्रश्न गंभीर आहे. यातून निर्माण होणारी आर्थिक विषमता चिंताजनक आहे. ती देशाच्या विकासातही अडसर ठरते. या सगळ्यातून येणार्या चिंतामुक्तीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे स्मरण आणि त्यांचा उपदेश अंगिकारणे हाच खात्रीचा उपाय आहे.
Related
Articles
पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता एटीएमची सेवा
17 Apr 2025
वाचक लिहितात
21 Apr 2025
शेअर बाजारात विक्रमी वाढ
16 Apr 2025
मुंढवा चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल
17 Apr 2025
भारत बांगलादेशाविरुद्ध खेळणार तीन टी-२०,एकदिवसाचे सामने
16 Apr 2025
हिमनद्या वाचवण्यासाठी तपमानवाढ रोखावी लागेल
17 Apr 2025
पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता एटीएमची सेवा
17 Apr 2025
वाचक लिहितात
21 Apr 2025
शेअर बाजारात विक्रमी वाढ
16 Apr 2025
मुंढवा चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल
17 Apr 2025
भारत बांगलादेशाविरुद्ध खेळणार तीन टी-२०,एकदिवसाचे सामने
16 Apr 2025
हिमनद्या वाचवण्यासाठी तपमानवाढ रोखावी लागेल
17 Apr 2025
पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता एटीएमची सेवा
17 Apr 2025
वाचक लिहितात
21 Apr 2025
शेअर बाजारात विक्रमी वाढ
16 Apr 2025
मुंढवा चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल
17 Apr 2025
भारत बांगलादेशाविरुद्ध खेळणार तीन टी-२०,एकदिवसाचे सामने
16 Apr 2025
हिमनद्या वाचवण्यासाठी तपमानवाढ रोखावी लागेल
17 Apr 2025
पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता एटीएमची सेवा
17 Apr 2025
वाचक लिहितात
21 Apr 2025
शेअर बाजारात विक्रमी वाढ
16 Apr 2025
मुंढवा चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल
17 Apr 2025
भारत बांगलादेशाविरुद्ध खेळणार तीन टी-२०,एकदिवसाचे सामने
16 Apr 2025
हिमनद्या वाचवण्यासाठी तपमानवाढ रोखावी लागेल
17 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
4
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
5
केंद्र सरकारच्या मध्यस्थीला यश
6
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर