व्हॉट्सऍप कट्टा   

ं कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा.
ं नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे ...
बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही.कारण..पडणार्‍या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही..
ं आणि वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं..डबक्यावर डास येतात आणि झर्‍यावर राजहंस! निवड आपली आहे..
ं कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
ं डोक शांत असेल, तर निर्णय चुकत नाहीत, अन्...भाषा गोड असेल, तर माणसं तुटत नाहीत.
ं जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून..!
ं मोर नाचतानासुद्धा रडतो...आणि...राजहंस मरतानासुद्धा गातो...दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि
सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात.
ं किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून-खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नाही.
म्हणून नेहमी आनंदी राहा.
*****
सूड घेतल्याचा आनंद एकच दिवस टिकतो पण, क्षमा केल्याने मात्र आपल्या जीवनातील एक विरोधक कमी होतो; आणि, जीवनात जेवढे कमी विरोधक असतील तेवढीच आपण जास्त प्रगती करू शकतो; त्यामुळे सूड घेण्याचा विचार करण्यापेक्षा माफ व क्षमा करण्याचा पर्याय नक्कीच उत्तम असतो!
*****
ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना, त्या दिवसापासून ‘रुसायचा’ आणि ‘थकायचा’ अधिकार संपतो.
*****
एक माणूस रविवारी डॉक्टरकडे जातो.
माणूस : डॉक्टर साहेब माझी बायको मला काही महत्त्वच देत नाही.
नेहमी चिडचिड करते.
माझे काहीच ऐकत नाही.
तुम्ही तिला शांत करू शकाल?
डॉक्टर : अरे बाबा हे एवढं सोपं असतं तर मी रविवारी दवाखाना उघडून बसलो असतो का ?
या नव्या वर्षात...
तुमचे मेडिक्लेमचे पैसे वाया जावोत..
तुम्हाला बँक लॉकरमधे जागा कमी पडो..
तुमचे स्पोर्ट शूज लवकर फाटोत..
तुमचे नवीन कपडे सैल होवोत..
तुमच्या फ्रीजमध्ये जागा न उरो..
रस्त्यात एकदा वर केलेला हात, 
सारखे ओळखीचे लोक भेटल्याने खाली घ्यायला न मिळो..
हसून हसून तुमचे तोंड दुखो..
पाहुण्यांमुळे पडलेल्या भांड्यांच्या ढिगाने 
तुमची कामवाली पळून जावो..
तुमचे कौतुक करताना आमचे तोंड दुखो..
तुमचा आदर्श घेणार्‍यांच्यात स्पर्धा वाढो..
तुमच्या पासपोर्टवर भरपूर शिक्के पडोत..
असेच दर वर्षी घडो..
-------
डोकं चालवा भाऊ... 
घरोघरी फिरुन तुमचा हात पाहुन तुमचं भविष्य सांगणार्‍याच्या तोंडी खालील वाक्य असतील तर लगेच भानावर या! ...
फक्त एवढे पाठ करून ठेवा.. तुम्ही सुध्दा कुणाचंही भविष्य सांगू शकता 
लई मोठं मन हाय तुमचं भाऊ,
लोकं फायदा घेतात तुमचा भाऊ,
आयुष्यात लई कष्ट केले तुम्ही भाऊ,
कुणा बद्दल वाईट चिंतीत नाय तुम्ही भाऊ...
पण तुमचे विषयी वाईट करतेत लोक भाऊ,
पैसा लई कमवते तुम्ही भाऊ 
पण पैसा टिकत नाही भाऊ,
लई मेहनत करूनबी काम होत नाही भाऊ,
तोंडापशी आलेला घास निघून जातो ना भाऊ,
देवावर लई श्रद्धा आहे तुमची भाऊ,
पण देवाबद्दल तक्रार बी हाय तुमची भाऊ,
पन येचात देवाचा दोष नसतंय भाऊ,
नशिब लई जोरात हाय तुमचं भाऊ, सुख, समाधान आणि बक्कळ पैसा लिहून ठेवलाय देवानी भाऊ,
लाथ मारीन तीथं पाणी काढनार तुम्ही भाऊ,
फक्त एक नड हाय तुम्हाला भाऊ,
तुमच्या जवळच्यांनीच आडून धरलंय तुम्हाला भाऊ,
तुमच्या पायाखालची माती नेउन करनी केली तुमच्यावर भाऊ,
तुमची परगतीच आडून धरली भाऊ,
पण काळजी करायची नाय भाऊ,
अंबाबाईचे आशिर्वादानी तुमची सगळी नड काढून टाकतंय भाऊ,
फक्त दीड हजार रूपये खर्च करावं लागन भाऊ...
--------

Related Articles