बंगळुरुचा एकतर्फी विजय   

जयपूर :  विराट कोहली आणि फिल सॉल्टच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने राजस्तान रॉयल्सला तब्बल ९ फलंदाज  राखून पराभूत केले. फिल सॉल्ट याला सामनावीर म्हणून घोषित केले. या सामन्यात विराट कोहलीने  नाबाद ६२ धावा केल्या. फिल सॉल्टने देखील ६५ धावा केल्या. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या देवदत्त पडिक्कल याने नाबाद ४० धावा केल्या. फलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर बंगळुरुने एकतर्फी विजय मिळवत गुणतालिकेत तिसर्‍या स्थानावर झेप घेतली. तर ८ अवांतर धावा बंगळुरुला मिळाल्या. 
 
मात्र या सामन्याआधी बंगळुरुच्या संघाने नाणेफेक जिंकली होती. आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुच्या गोलंदाजांनी राजस्तानच्या फलंदाजांना २० षटकांत १७३ धावांवर रोखले. त्यामुळे बंगळुरुच्या फलंदाजांना विजयासाठी १७४ धावांचे आव्हान मिळाले. आणि हे आव्हान बंगळुरुच्या फलंदाजांनी अगदी सहज पार केले. बंगळुरूचे गोलंदाज भुवनेश्‍वरकुमार, यश दयाल, हेझलवूड, कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी १ फलंदाज बाद केला. 
 
त्याआधी राजस्तानच्या फलंदाजांपैकी यशस्वी जैस्वाल याने ७५ धावा केल्या. मात्र त्याचे हे अर्धशतक वाया गेले. हेझलवूडने त्याला पायचित बाद केले. संजू सॅमसन याने १५ धावा केल्या. कृणाल पांड्या याने चकविणारा चेंडू टाकत जितेश शर्माकडे त्याला झेलबाद केले. रियान पराग याला ३० धावांवर असताना यश दयाल याने शानदार गोलंदाजी करत कोहलीकडे झेलबाद केले. ध्रुव ज्युरेल याने नाबाद ३५ धावा केल्या. त्याला साथ देणारा हॅटमायर हा अवघ्या ९ धावांवर भुवनेश्‍वरकुमार याच्या गोलंदाजीवर पड्डीकलकडे झेलबाद झाला. नितीश राणा याने नाबाद ४ धावा केल्या. तर ५ अवांतर धावा राजस्तानच्या संघाला मिळाल्या.  
 
संक्षिप्त धावफलक 
बंगळुरु : फिल सॉल्ट ६५, विराट कोहली नाबाद ६२, देवदत्त पड्डीकल नाबाद ४०, अवांतर ८ धावा एकूण १७.३ षटकांत १७५/१
राजस्तान : जैस्वाल ७५, सॅमसन १५, रिया पराग ३०, ज्युरेल ३५, हॅटमायर ९, नितीश राणा नाबाद ४ एकूण २० षटकांत १७३/४ 

Related Articles