अलकनंदा नदीत मोटार कोसळून पाच बेपत्ता   

न्यू टेहरी: उत्तराखंडच्या टेहरी जिल्ह्यातील शनिवारी सकाळी अलकनंदा नदीत मोटार कोसळून पाच प्रवासी बेपत्ता झाले आहेत. एका महिलेला वाचविण्यात यश आले. बद्रिनाथ महामार्गावरील भगवान गावाजवळ काल सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास  अपघात झाला. सहा प्रवाशांसह महिंद्रा थार अलकनंदा नदीत कोसळली होती, अशी माहिती देवप्रयाग पोलिस ठाण्याचे अधिकारी मणिपाल सिंग रावत 
यांनी दिली. 
 
राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाने आणि पोलिसांनी एका महिलेला वाचविले आहे. तिला रुग्णालयात दाखल केले आहे. पाच जण बेपत्ता आहेत. त्याचा शोध धावला येथील राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाचे पाणबुडे घेत आहेत.पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले की, मोटार फरिदाबादहून चमोली जिल्ह्यातील गौछरकडे जात होती. अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट आहे. प्रवासात चालकाला डुलकी लागली असावी किंवा पावसामुळे निसरड्या  झालेल्या रस्त्यावर नियंत्रण सुटल्यामुळे मोटार नदीत कोसळली असावी, असाही अंदाज आहे. 

Related Articles