महायुतीच्या निर्णयामुळे हर्षवर्धन पाटील, रमेश थोरात यांची कोंडी   

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील तीनही पक्षांना सोडून गेलेल्या आणि विरोधात निवडणूक लढविलेल्या कोणत्याही नेत्यांला महायुतीतील घटक पक्षांने परस्पर संमतीशिवाय पक्षांत प्रवेश देवू नये असा महायुतीचा निर्णय झाल्याने जिल्ह्यातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (इंदापूर) जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात (दौंड) यांची कोंडी झाली आहे.
 
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँगे्रसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या अडचणीत आलेल्या कार्ययोगी आणि नीरा-भिमा या दोन सहकारी साखर कारखान्यांना केंद्राकडून मोठी मदत करण्यात आली होती. त्याचबरोबर राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्षपद त्यांना देवू केले होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या निवडणुकीतील पराभवानंतर काही दिवसातच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी हालचाली सुरू केल्या, मात्र मुळच्या भाजपसह महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, शिवसेना शिंदे गटाच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रवेशास विरोध केला आहे.
 
असाच प्रकार जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात यांच्या बाबतचा आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष सोडून त्यांनी राष्ट्रवादी काँगे्रस शरद पवार पक्षात प्रवेश करून दौंडमधून निवडणूक लढविली. एकत्रीत राष्ट्रवादी असताना थोरात यांना अजित पवारांनी जिल्हा बँकेचे अध्यक्षपदाची अनेक वेळा संधी दिली. मात्र त्यांनी एकदा राष्ट्रवादी पक्ष एकत्रीत असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आताही पराभवानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षात प्रवेश करावयाचा आहे. मात्र त्यांच्या प्रवेशाला महायुतीमधील सर्व कार्यकर्त्यांचा विरोध आहे. मात्र थोरात आजही आपण अजित पवारांच्या संपर्कात असून आज उद्या आपण या पक्षात प्रवेश करणार असल्याचे कार्यकर्त्यांशी बोलतान सांगता असतात.या पार्श्वभूमीवरजे पराभूत झाले आहेत. त्यांची मोठीच कोंडी झाली आहे. आपला जुना नेता सत्तेत आहे. परंतु जाहीरपणे त्यांच्या सोबत जाता येत नाही अशी त्यांची परिस्थिती 
झाली आहे. 

Related Articles