E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
शुल्कवाढीचा भूकंप
Wrutuja pandharpure
13 Apr 2025
अर्थनगरीतून , महेश देशपांडे
ट्रम्पशाहीमुळे अलिकडेच अवघ्या जगाची झोप उडाली. भारताच्या अर्थव्यवस्थेवर या नव्या व्यापारयुद्धाचा कसा परिणाम होणार, याची चर्चा सुरु झाली. भारताप्रमाणेच अमेरिकेवरही ताज्या शुल्कवाढीचा परिणाम झाला असून नागरिकांनी तिथे वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्व देशांवर ‘प्रत्युत्तर शुल्क’ शुल्क लादल्यामुळे जागतिक अनिश्चितता वाढत आहे. त्यामुळे भारताच्या सर्वात मोठ्या निर्यात बाजारपेठेतील संभाव्य मंदीची चिंता वाढली आहे. त्याचा परिणाम भारताच्या आर्थिक वाढीवरही होऊ शकतो. या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ६.३ ते ६.८ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. तथापि, तो कमी मर्यादेच्या जवळ राहण्याची शक्यता जास्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिजतेलाच्या कमी किमती हीदेखील भारतासाठी चांगली बातमी आहे. सध्या ब्रेंट क्रूड प्रति पिंप ६५ डॉलरच्या खाली आले आहे. ही किंमत जवळपास चार वर्षांमध्ये सर्वात कमी आहे. ‘गोल्डमन सॅक्स’ने २०२५ साठी ब्रेंट क्रूडच्या सरासरी किंमतीचा अंदाज प्रति पिंप ६९ डॉलरपर्यंत कमी केला आहे. ‘जे. पी मॉर्गन चेस अँड कंपनी’ने सांगितले की अमेरिकेची अर्थव्यवस्था या वर्षी मंदीत जाण्याची शक्यता आहे. कंपनीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ मायकेल फेरोली यांनी सांगितले की, आम्ही अमेरिकेचा जीडीपी टॅरिफमुळे कमी होण्याची अपेक्षा करतो आणि संपूर्ण वर्षासाठी वास्तविक जीडीपी वाढ -०.३ टक्के अपेक्षित आहे.
अर्थशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकासदर ३० ते ६० बेसिस पॉइंट्सने घटू श्शकतो.एचडीएफसी बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ साक्षी गुप्ता यांच्या मते २०२६ साठी ६.६ टक्के वाढीच्या अंदाजात ३० बेसिस पॉईंट घसरण्याचा धोका आहे. ट्रम्प यांच्या प्रत्युत्तर शुल्काच्या घोषणेपूर्वी अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या मासिक आर्थिक आढाव्यात म्हटले आहे की जागतिक राजकीय तणाव, व्यापार धोरणांमधील अनिश्चितता, आंतरराष्ट्रीय वस्तूंच्या किमती आणि आर्थिक बाजारातील अस्थिरता वाढीच्या संभाव्यतेसाठी महत्त्वपूर्ण जोखीम निर्माण करतात. त्यात म्हटले आहे की खासगी क्षेत्राने भारतीय अर्थव्यवस्थेत गुंतवणूक वाढवली तर जोखीम बर्याच प्रमाणात नियंत्रित करता येऊ शकते. अहवालात म्हटले आहे की वैयक्तिक प्राप्तिकर रचनेतील बदलामुळे मध्यमवर्गाच्या हाती अधिक पैसे राहतील त्यामुळे उपभोगाची मागणी सुधारेल अशी अपेक्षा आहे.
अमेरिकेतही धक्का
अमेरिकेत आजकाल खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत आहे. फर्निचरपासून उपकरणे आणि दारूपर्यंत मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्कवाढीच्या धोरणामुळे घाबरलेल्या लोकांच्या मनात महागाईची भीती आहे. त्यामुळे लोक किमती वाढण्यापूर्वी वस्तू खरेदी करून साठेबाजी करत आहेत. वाढीव शुल्कामुळे दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढण्याची अपेक्षा असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची भीती काही अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. वाहन विक्री ११.३ टक्क्यांनी वाढली आहे. कारण ट्रम्प यांनी परदेशी वाहने आणि सुट्या भाग़ांवर २५ टक्के जादा शुल्क लागू केले आहे. क्वीन्स, न्यूयॉर्क येथे राहणारे ५० वर्षीय नोएल पेग्युरो म्हणाले की, गेल्या आठवड्यात त्यांनी कारचे भाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि बागकामाच्या वस्तूंवर सुमारे ३,५०० डॉलर खर्च केले. त्यांनी आपल्या मुलासाठी ४० इंचाचा हायसेन्स टेलिव्हिजन आणि मॅकबुक लॅपटॉपदेखील विकत घेतला. ते अनेक दिवसांपासून या वस्तू खरेदी करण्याचा विचार करत होते; परंतु अचानक भाव वाढल्याच्या शक्यतेमुळे आता त्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आता परस्पर काही गोष्टी खरेदी करून ठेवणे शहाणपणाचे असले, तरी अधिक साठा भरताना कर्जापासून दूर राहणेही महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ‘जिओ’साठी एक गजब रणनीती तयार केली. जिओ यूजर्सना त्याचा फायदा झाला; परंतु त्यामुळे ‘गुगल’ची झोप उडाली. ‘रिलायन्स जिओ’कडून कोट्यवधी प्रीपेड आणि पोस्टपेड यूजरना मोफत ‘क्लाउड स्टोरेज’ दिले जात आहे. ‘गुगल यूजर्स’ना अकाऊंट बनवल्यानंतर क्लाउडवर १५ जीबी डाटा स्टोरेजची मोफत सुविधा दिली जात आहे; परंतु अंबानी यांनी ‘जिओ’वर ही मर्यादा तिप्पट केली आहे. ‘गुगल’च्या १५ जीबी मर्यादेमध्ये यूजरला जीमेल, गुगल ड्राइव्ह आणि गुगल फोटोज आदी अॅप्सचा वापर करावा लागतो. गुगल ड्राइव्ह स्टोरेजसाठी यूजरला वेगळे स्टोरेज मिळत नाही. १५ जीबीच्या स्टोरेजमध्ये हे काम करावे लागते. जीमेलमध्ये जास्त स्टोरेज वापरल्यावर ड्राइव्हवर कमी स्टोरेज मिळते; परंतु अंबानी यांनी ‘प्रीपेड यूजर्स’ना २९९ रुपयांच्या प्लॅनवर मोफत ५० जीबी ‘क्लाउड स्टोरेज’ची ऑफर दिली आहे. ‘प्रीपेड प्लॅन’च नाही तर पोस्टपेड प्लॅनमध्येही ‘क्लाउड स्टोरेज’चा फायदा दिला जातो. ५० जीबी स्टोरेजची ऑफर मिळते.
१५ जीबीपेक्षा जास्त स्टोरेज झाल्यावर ‘गुगल सर्व्हिस’चा वापर करता येत नाही. त्यानंतर मेल येणेसुद्धा बंद होते. जीमेल, फोटोज किंवा ड्राइव्ह रिकामे करावे लागते. अन्यथा, गुगलचा तीनपैकी एक प्लॅन विकत घ्यावा लागतो. लाइट, बेसिक आणि स्टँडर्ड प्लॅनसाठी शुल्क आहे. ‘लाईट प्लॅन’साठी पहिले दोन महिने १५ रुपये लागतात. त्यानंतर ५९ रुपये दर महिन्याला लागतात. ‘लाइट प्लॅन’मध्ये ३० जीबी स्टोरेज मिळते. ‘बेसिक प्लॅन’मध्ये १०० जीबी स्टोरेज दिले जाते. त्यासाठी पहिले दोन महिने ३५ रुपये तर तिसर्या महिन्यापासून १३० रुपये लागतात. ‘स्टँडर्ड प्लॅन’मध्ये २०० जीबी स्टोरेज मिळते. त्यात पहिल्या दोन महिन्यांसाठी ५० रुपये तर तिसर्या महिन्यापासून २१० रुपये द्यावे लागतात.
अंबानी यांच्या ‘जिओ’ने ‘फाईव्ह जी नेटवर्क’मध्येही देशात आघाडी घेतली आहे. ‘रिलायन्स जिओ’चा फाईव्ह जी डाउनलोडिंग स्पीड १५८.६३ एमबीपीएस आहे. ‘एअरटेल’चा वेग १००.६७ एमबीपीएस आहे. ‘व्हीआय’चा डाउनलोडिंग स्पीड २१.६० एमबीपीएस आहे तर ‘बीएसएनएल’चा डाउनलोडिंग स्पीड ७.१८ एमबीपीएस आहे.दरम्यान विदेशी योगदान (नियमन) कायदा (एफसीआरए) अंतर्गत सरकारने विदेशी निधी प्राप्त करणार्या संस्थांची कडक तपासणी सुरू केली आहे. यामुळे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात परवाने रद्द केले जात आहेत. परिणामी, नागरी समाज गट(सिव्हिल सोसायटी) ,स्वयंसेवी संस्था आणि धोरण संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंता निर्माण होत आहे. त्यांना आता ‘एफसीआरए’ची मंजुरी मिळवताना किंवा परवान्याचे नूतनीकरण करताना अनेक नियामक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. गृह मंत्रालयाच्या वार्षिक अहवालातील आकडेवारीवर नजर टाकल्यास नियामक दृष्टिकोनातील बदल दिसून येतो.
Related
Articles
वणव्यात आंब्याच्या बागेचे नुकसान
12 Apr 2025
केंद्र सरकारच्या मध्यस्थीला यश
15 Apr 2025
कन्नड अभिनेते जनार्दन चौहान यांचे निधन
15 Apr 2025
नगर रस्त्यावरील बीआरटी काढण्यास सुरुवात
14 Apr 2025
घाऊक महागाई दर २.०२ टक्के
16 Apr 2025
भूसंपादन मोबदल्याच्या विलंबापोटी दिल्या जाणार्या व्याजात कपात
16 Apr 2025
वणव्यात आंब्याच्या बागेचे नुकसान
12 Apr 2025
केंद्र सरकारच्या मध्यस्थीला यश
15 Apr 2025
कन्नड अभिनेते जनार्दन चौहान यांचे निधन
15 Apr 2025
नगर रस्त्यावरील बीआरटी काढण्यास सुरुवात
14 Apr 2025
घाऊक महागाई दर २.०२ टक्के
16 Apr 2025
भूसंपादन मोबदल्याच्या विलंबापोटी दिल्या जाणार्या व्याजात कपात
16 Apr 2025
वणव्यात आंब्याच्या बागेचे नुकसान
12 Apr 2025
केंद्र सरकारच्या मध्यस्थीला यश
15 Apr 2025
कन्नड अभिनेते जनार्दन चौहान यांचे निधन
15 Apr 2025
नगर रस्त्यावरील बीआरटी काढण्यास सुरुवात
14 Apr 2025
घाऊक महागाई दर २.०२ टक्के
16 Apr 2025
भूसंपादन मोबदल्याच्या विलंबापोटी दिल्या जाणार्या व्याजात कपात
16 Apr 2025
वणव्यात आंब्याच्या बागेचे नुकसान
12 Apr 2025
केंद्र सरकारच्या मध्यस्थीला यश
15 Apr 2025
कन्नड अभिनेते जनार्दन चौहान यांचे निधन
15 Apr 2025
नगर रस्त्यावरील बीआरटी काढण्यास सुरुवात
14 Apr 2025
घाऊक महागाई दर २.०२ टक्के
16 Apr 2025
भूसंपादन मोबदल्याच्या विलंबापोटी दिल्या जाणार्या व्याजात कपात
16 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
रेपो दरात पुन्हा कपात
2
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
3
प्रशांत कोरटकर याला जामीन
4
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
5
राम रहीम पुन्हा तुरूंगाबाहेर
6
राज्यपालांवर अंकुश (अग्रलेख)