खैबरमध्ये गोळीबारात दोन दहशतवादी ठार   

पेशावर : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात तेहरीक ए तालिबान पाकिस्तानचे दोन दहशतवादी म्होरके ठार झाले आहेत. लष्कराबरोबर उडालेल्या चकमकीत ते ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 
 
हफीजउल्ला उर्फ कोचवान हा दहशतवादी म्होरक्या ठार झाल्याचा दावा सुरक्षा दलांनी केला.  कोचवान आणि आणखी एक दहशतवादी मोटारसायकलवरून जात असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. तिबेगररा रस्त्यावरील लोअर डीर जिल्ह्यात गोळीबारात ते ठार झाले. खैबरच्या दहशतवाद विरोधी पथकाने सांगितले की, दोघांवर ५० लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. अन्य दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असून घटनास्थळावरील बंदोबस्तात वाढ केली आहे.
 
दरम्यान, कारवाईत मारला गेलेला दहशतवादी म्होरक्या हफीजउल्ला दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत होता. तो डीर जिल्ह्याचा रहिवासी असून कॉम्पुटर सायन्सचा पदवीधर होता. तो पूर्वी जैश ए मुहम्मद संघटनेशी संलग्न होता. त्यानंतर त्याने टीटीपी संघटनेत प्रवेश केला. मर्दन परिसरात पर्यायी सरकार चालवत होता. विविध दहशतवादी हल्ल्यात त्याचा सहभाग आहे. त्यामध्ये २००९ आणि २०१४ मध्ये त्याने सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. 

Related Articles