कुटुंबाच्या विकासात विरोधकांना अधिक रस   

पंतप्रधान मोदी यांची टीका

वाराणसी : सत्ता संपादन करणे आणि कुटुंबाचा विकास हा विरोधी पक्षांचा एककल्ली कार्यक्रम आहे, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. या उलट आमचे सरकार जनतेसाठी कार्यरत असून समाजाचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. 
 
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी ३ हजार ८८० कोटी रुपयांच्या ४४ प्रकल्पांचा शिलान्यास झाला. त्या प्रसंगी  ते म्हणाले, सब का साथ, सब का विकास मूलमंत्र घेऊन केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे. त्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांचा विकास व्हावा, हे ध्येय समोर ठेवले आहे. या उलट विरोधी पक्ष सत्तेसाठी भुकेले आहेत. ते त्यासाठी  दिवस रात्र राजकीय खेळी करण्यात रममाण आहेत. राष्ट्रहितापेक्षा त्यांना कुटुंबाचा विकास अधिक महत्त्वाचा वाटतो. कुटुंब केंद्रीत विकासावर त्यांचा अधिक भर आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी भाषणाची सुरुवात भोजपुरी भाषेत केली. या वेळी त्यांनी समाजसुधारक महात्मा फुले यांच्या कायार्र्चा गौरव केला. जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. समाजात समानता आणि महिला सबलीकरणासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरक असल्याचे सांगितले. 

Related Articles