केंद्राची नोकर भरती योजना फसवी   

नवी दिल्ली : केंद्र सरकारची नोकर भारती प्रोत्साहन योजना पोकळ असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. तो आरोप भाजपने फेटाळून लावला असून राहुल आपले अज्ञान प्रकट करुन तरुणांची दिशाभूल करण्यासाठी विषयाचा हत्यार म्हणून वापर करत असल्याचे म्हटले आहे. 
 
राहुल यांनी नोकरीशी संबंधित केंद्राच्या प्रोत्साहन योजनेवर टीका केली. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर केलल्या योजनेची सरकारने योग्य ती व्याख्या केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, सरकार दरदिवशी नव्या घोषणा करते. पण तरुण अजूनही योग्य संधीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसते. एक वषार्ंंपूर्वी योजना जाहीर केली होती. अजूनही देशात कोट्यवधी नोकर्‍यांची गरज असून त्यासाठी सरकार ठोस पावले उचलताना दिसत नाही.
 
राहुल यांचा समाचार घेताना भाजपचे आयटी विभागाचे अमित मालवीय म्हणाले, राहुल यांना सल्लागारांनी त्यांना योग्य ती माहिती दिलेली दिसत नाही. वस्तुस्थिती पूर्णत: वेगळी आहे. तरुणांची दिशाभूल करण्यासाठी ते आपल्या अज्ञानाचा शस्त्र म्हणून वापर करत आहे. समाज माध्यमाचा चुकीचा वापर करुन योजनांबाबत खोटी माहिती पसरविली जात आहे. 

Related Articles