पद्म किताबासाठी नामांकन आणि शिफारस प्रक्रिया सुरू   

नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केल्या जाणार्‍या पद्म किताब २०२६ साठी नामांकन आणि शिफारसींची प्रक्रिया सुरू केली आहे.गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पद्म किताबांसाठी नामांकन आणि शिफारसी सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ आहे. ऑनलाइन नामांकन करता येणार आहे. पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी किताब आहेत. १९५४ मध्ये स्थापन झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. 
 
हे पुरस्कार कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यवसाय आणि उद्योग इत्यादी सर्व क्षेत्रांमधील विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरी आणि सेवेसाठी दिले जातात.जात, व्यवसाय, पद किंवा लिंग असा कोणताही भेदभाव न करता सर्व व्यक्ती या किताबासाठी पात्र आहेत. त्यामुळे नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी स्व-नामांकनासह नामनिर्देशन आणि शिफारसी कराव्यात, असे त्यात म्हटले आहे. या किताबांशी संबंधित नियमही संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Related Articles