द्रमुकच्या ज्येष्ठ मंत्र्याने उप सरचिटणीस पद गमावले   

शैव-वैष्णव वादाचा फटका

चेन्नई : तामिळनाडूत शैव आणि वैष्णव, असा वाद निर्माण करणारे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री के. पोनमुडे यांची शुक्रवारी द्रमुकच्या उप सरचिटणीस पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. द्रमुकचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी याबाबतचा निर्णय काल जाहीर केला. मात्र, त्याबाबतचे कारण स्पष्ट केले नाही. पोनमुडे यांच्या रिकाम्या जागी राज्यसभेचे खासदार तिरुची शिवा यांची तातडीने नियुक्ती देखील केली आहे.  पोनमुडे यांनी शैव आणि वैष्णव विषयावरुन वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे राज्यात वाद निर्माण झाला होता. त्याचा पडसाद राज्यात उमटले होते. द्रमुकच्या नेत्या, खासदार कणीमोळी आणि भाजपचे अध्यक्ष के. अण्णामलाइर्ं यांच्यातही या विषयावरुन ठिणगी पडली होती. पोनमुडे यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. एका चित्रफितीत पोनमुडे यांनी वैश्य व्यवसाय करणार्‍या महिलांबाबत अपशब्द काढले होते. कणीमोळी यांनी त्यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला होता तसेच ते स्वीकारता येणार नाही

Related Articles