सोने ९६ हजारांवर!   

नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या दराने पुन्हा विक्रमाला गवसणी घातली आहे. शुक्रवारी सोन्याचा दर प्रति दहा गॅ्रम ९६ हजारांवर पोहोचला. ही घोडदोड अशीच कायम राहिल्यास, सोने लवकरच १ लाखांवर पोहोचेल.जळगावच्या सराफ बाजारात काल सोन्याच्या दराने ९५ हजारांचा आकडा पार केला. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर जीएसटीसह ९५ हजार २०० रुपयांवर पोहोचले. विशेष म्हणजे, दोन दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल ३ हजार ४०० रुपयांची वाढ झाली आहे.गुरूवारी सोन्याच्या दरात २,३०० रुपयांची तर काल १,१०० रुपयांनी वाढ झाली. दरम्यान, चांदीच्या दरात सुद्धा दोन दिवसांत ३ हजार ५०० रुपयांची वाढ झाली असून, चांदीचे दर आता प्रतिकिलो ९७ हजार ५०० रुपये इतके आहे.मागील आठवड्यात सोने  प्रति दहा ग्रॅम ९३,००० पर्यंत खाली आले होते. तर, चांदी प्रतिकिलो ९५,५०० रुपये होती.

Related Articles