औद्योगिक उत्पादन मंदावले   

नवी दिल्ली : देशाच्या औद्योगिक उत्पादन वाढीचा वेग मंदावला आहे. काही प्रमुख क्षेत्रांनी केलेल्या खराब कामगिरीमुळे फेब्रुवारी महिन्यात औद्योगिक उत्पादन वाढीचा वेग सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजे २.९ टक्क्यांपर्यंत खाली आला.उत्पादन, खाणकाम, ऊर्जा यांसारख्या काही प्रमुख क्षेत्रांनी खराब कामगिरी केली. त्यामुळे औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक ५ टक्क्यांवरुन २.९ टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा दर ५.६ टक्के होता. विशेष म्हणजे, ऑगस्टमध्ये हा दर शून्य टक्के नोंदविला गेला होता. 
 
फेब्रुवारी महिन्यात उत्पादन क्षेत्राची उत्पादन वाढ २.९ टक्क्यांपर्यंत घसरली. मागील वर्षी याच कालावधीत हा दर ४.९ टक्के होता. खाणकाम क्षेत्राचा दर मागील वर्षी याच कालावधीत ८.१ टक्के होता. तो यंदा १.६ टक्क्यांपर्यंत घसरला.उर्जा क्षेत्राच्या दरवाढीचा दर ३.६ टक्के नोंदवला गेला. मागील वर्षी याच कालावधीत हा दर ७.६ टक्के होता.एप्रिल-फेब्रुवारी या कालावधीत आयआयपी ४.१ टक्क्यांनी वाढला. वर्षभरापूर्वी हा दर ६ टक्क्यांपेक्षा कमी होता.

Related Articles