पादचारी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे   

शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याकडून चौकशीची मागणी 

येरवडा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गोल्फ क्लब चौकापर्यंत सुरू  असलेले पादचारी मार्गाचे काम निकृष्ट आणि संथ गतीने ठेकेदार करत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आक्रमक झाले असून अधिकारी आणि ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.डॉ. आंबेडकर चौक ते गोल्फ क्लब चौकापर्यंत गेल्या वर्षी २०२४-२५ च्या महापालिका अंदाज पत्रकात दिलेल्या निधीतून हा पादचारी मार्ग बनविण्यात येत आहे. परंतू गेल्या ४ महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत हा मार्ग आहे. फक्त  खोदून ठेवलेले दिसत आहे. ३१ मार्च २०२५ अखेर काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र  सध्याची परिस्थिती जैसे थे आहे. 
 
३१ मार्च २०२५ पर्यत सर्व ठेकेदारांनी येरवडा क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत हद्दीतीलल कामे पूर्ण करायला पाहिजे होती.तसेच झालेले दिसत नाहीत. काही कामे फक्त कागदावरच केले आहेत. शिवाय कामाची बिल ही काढलेले दिसत असल्याची माहिती  शिवसेना पक्षाचे शाखा प्रमुख शशिकांत साटोटे यांनी दिले आहे. येरवडा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गोल्फ क्लब चौक या रस्तावरून पुण्यात अनेक मंत्री आणि महत्त्वाच्या व्यक्ती ये-जा करत असतात येरवडा क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत असल्याने अधिकार्‍यांनी लक्ष देऊन विकास कामे करणे अपेक्षित  आहे. मात्र उलट अशा कामाकडेच दुर्लक्ष होताना दिसत आहे. 
 
या पादचारी मार्गावरून कामा बाबत येरवडा पोलिस वाहतूक विभागाने ही महापालिककडे तक्रार केली आहे. शिवाय काही स्थानिक विविध पक्षाचे पदाधिकारी आणि राज्य शासनाचे अधिकार्‍यांनी या रस्त्यावरील अर्धवट काम विषयी पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता यांच्या बरोबर दूरध्वनी तक्रार केलेली आहे. या अर्धवट खोदलेल्या कामामुळे ये-जा करताना गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले मोठी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी अनेक छोटे अपघात झाल्याची समोर आले आहे.  तसेच दुचाकी, चारचाकी वाहन,  रूग्णवाहिका, अग्निशामक दलाचे बांब यांनी या रस्त्यावरून संथ गतीने ये-जा करावी लागत आहे. 

Related Articles