‘वक्फ’बाबतच्या अर्जावर १६ रोजी सुनावणी   

नवी दिल्ली : वक्फ (दुरुस्ती) कायदा, २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्‍या १० अर्जांवर सर्वोच्च न्यायालय १६ एप्रिल रोजी सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती संजय कुमार  आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. 
 
दरम्यान, केंद्र सरकारने मंगळवारी कॅव्हेट दाखल केले असून आपली बाजू ऐकून घेतल्याशिवाय निकाल देऊ नये, असे म्हटले आहे.राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी, ‘आप’ नेते अमानतुल्ला खान, असोसिएशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स, अर्शद मदनी, समस्त केरळ जमीयतुल उलेमा, नागरी हक्क संरक्षण असोसिएशन, अर्शद मदनी, समस्थ केरळ जमियातुल उलेमा, अंजुम कादारी, तैय्यब खान सलमानी, महमद शफी, महमद फयलुर्रहीम, आरजेडी नेता कुमार झा, फैयाज अहमद यांचा समावेश आहे. 

Related Articles