E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मुंगी घाटात रंगला कावड यात्रेचा थरार
Samruddhi Dhayagude
11 Apr 2025
सातारा, (प्रतिनिधी) : शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेत बुधवारी मुंगी घाटातील कावड सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. मानाच्या कावडी चढविताना ’हर हर महादेव’च्या जयघोषाने डोंगर दुमदुमून गेला. भक्तीशक्तीचा हा विराट सोहळा पाहण्यासाठी मुंगी घाट परिसरात लाखो भाविकांची उपस्थिती होती. रात्री उशिरा सासवड येथील भुतोजीबुवा तेली यांच्या मानाच्या कावडीने शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर यात्रेची सांगता झाली.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रेस चैत्र शुद्ध पंचमीच्या दिवशी शिव-पार्वतीच्या हळदी सोहळ्याने प्रारंभ झाला. त्यानंतर अष्टमीच्या दिवशी विवाह सोहळा झाला. याचदिवशी शंभू महादेव मंदिर ते बळीच्या मंदिरास मानाचे पागोटे (ध्वज) बांधण्याचा सोहळा उत्साहात झाला. नवमीच्या दिवशी धाराशिव जिल्ह्यातील भातांगळी येथील देवाची करवली असलेल्या मानाच्या काठीने शंभू महादेवाचे दर्शन घेतले, तर शुक्रवारी एकादशीच्या दिवशी लाखो शिवभक्तांनी एकादशीचा उपवास धरून महादेवाचे दर्शन घेतले, तर सायंकाळी इंदोर राजघराण्यातील काळगावडे राजे यांनी घोड्यावरून येऊन दर्शन घेतले.
शिंगणापूर यात्रेत कावड सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे शिंगणापूर यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात कावड यात्रा म्हणून ओळखली जाते. शनिवारी द्वादशीच्या दिवशी सकाळपासूनच पुष्कर तलावातील जलतीर्थ घेऊन वाजत-गाजत पायरी मागनि आलेल्या जवळपास एक हजारहून अधिक कावडींनी जलाभिषेक करून शंभू महादेवाचे दर्शन घेतले. याशिवाय सकाळपासूनच शिंगणापूर यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या मुंगी घाटातील कावड सोहळ्याचा थरार रंगला होता. सकाळी ११ वाजल्यापासून फलटण, बारामती, इंदापूर, माळशिरस तालुक्यांतील लहान-मोठ्या कावडीमुंगी घाटातून चढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दोन वाजल्यापासून सासवड पंचक्रोशीतील सासवड, खळद, शिवरी, बेलसर, एखतपूर, कुंभारवळण आदी ठिकाणच्या मानाच्या कावडी चढविण्यास प्रारंभ झाला.
मुंगीघाट डोंगरावरून मानवी हातांची साखळी करून कावडी घेऊन चढविताना भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. दुपारच्या ३७ अंश तापमानातही भाविक हा सोहळा पाहात हर हर महादेव, म्हाद्या धाव अशी शिवगर्जना करीत अवघा मुंगीघाट भक्तिमय झाला.
वडीधारक भाविकांनी साहस, श्रद्धा आणि भक्तीशक्तीचे विराट दर्शन घडवून अवजड कावडी घेऊन चार टप्प्यात मुंगीघाट सर केला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास सासवड येथील कैलास काशिनाथ कावडे (सासवड, ता. पुरंदर) यांची मानाची कावड मुंगीघाटातून वर चढविण्यात आली. यावेळी शिंगणापूरचे शिवकुमार कावडे, वीरभद्र कानवडे यांनी गूळ पाणी देऊन स्वागत केले. डोंगरमाथ्यावर कावड आल्यानंतर कावडीधारक भाविकांनी ढोलताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत, हर हर महादेव शिवगर्जना करत फटाक्यांच्या आतषबाजीत, कावडी नाचवून आनंद व्यक्त केला.
Related
Articles
समृद्धी महामार्गावर टोलवसुलीतून पिळवणूक
14 Apr 2025
मार्केटयार्डात संत्र्याला विक्रमी दर एक किलोला २२२ रुपये दर
17 Apr 2025
गोलंदाजीच्या बळावर पंजाबचा विजय
16 Apr 2025
भारतीय महिला तिरंदाजांचा विश्वचषक हुकला
12 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
16 Apr 2025
शेअर बाजारात विक्रमी वाढ
16 Apr 2025
समृद्धी महामार्गावर टोलवसुलीतून पिळवणूक
14 Apr 2025
मार्केटयार्डात संत्र्याला विक्रमी दर एक किलोला २२२ रुपये दर
17 Apr 2025
गोलंदाजीच्या बळावर पंजाबचा विजय
16 Apr 2025
भारतीय महिला तिरंदाजांचा विश्वचषक हुकला
12 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
16 Apr 2025
शेअर बाजारात विक्रमी वाढ
16 Apr 2025
समृद्धी महामार्गावर टोलवसुलीतून पिळवणूक
14 Apr 2025
मार्केटयार्डात संत्र्याला विक्रमी दर एक किलोला २२२ रुपये दर
17 Apr 2025
गोलंदाजीच्या बळावर पंजाबचा विजय
16 Apr 2025
भारतीय महिला तिरंदाजांचा विश्वचषक हुकला
12 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
16 Apr 2025
शेअर बाजारात विक्रमी वाढ
16 Apr 2025
समृद्धी महामार्गावर टोलवसुलीतून पिळवणूक
14 Apr 2025
मार्केटयार्डात संत्र्याला विक्रमी दर एक किलोला २२२ रुपये दर
17 Apr 2025
गोलंदाजीच्या बळावर पंजाबचा विजय
16 Apr 2025
भारतीय महिला तिरंदाजांचा विश्वचषक हुकला
12 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
16 Apr 2025
शेअर बाजारात विक्रमी वाढ
16 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार