विकास दर ६.५ टक्के राहणार   

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील व्यापार युद्ध आणि अनिश्चिततेमुळे भारतीय रिझर्व बँकेने विकास दरवाढीचा दर ६.७ टक्क्यांवरुन ६.५ टक्के राहील, असा अंदाज वर्तविला आहे. २०२५ -२६ या आर्थिक वर्षाचे पहिले पतधोरण सादर करताना रिझर्व बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा म्हणाले की, पहिल्या तिमाहीत विकासदर ६.५ टक्के, दुसर्‍या तिमाहीत ६.७ टक्के, तिसर्‍या तिमाहीत ६.६ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ६.३ टक्के राहील. याआधी, रिझर्व बँकेने चालू आर्थिक वर्षात विकास दरवाढीचा दर ६.७ टक्के वर्तविला होता. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी जगावर प्रत्युत्तर शुल्क लादले. ट्रम्प यांनी भारतासह ६० देशांवर ११-४९ टक्के प्रत्युत्तर शुल्क जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी कालपासून सुरु झाली आहे. ट्रम्प यांनी भारतावर २७ टक्के प्रत्युत्तर शुल्क लावले आहे. चीनवर अमेरिकेने १०४ टक्के शुल्क लावले आहे. याखेरीज, व्हिएतनाम, बांगलादेश, कंबोडिया आणि थायलंड यांसारख्या देशांना मोठ्या प्रत्युत्तर शुल्कास सामोरे जावे लागत आहे.

Related Articles