E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
दीनानाथ रूग्णालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
Wrutuja pandharpure
10 Apr 2025
पुणे
: दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये २९ मार्च रोजी गर्भवती महिलेला अत्यावश्यक उपचार देण्याची आवश्यकता असतानादेखील पैशांसाठी ते न दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे, रूग्णालयावर रूग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. तनिषा भिसे (वय २७) या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. रूग्णालयाबाहेर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून मोर्चा, आंदोलने, निदर्शने केली जात आहेत. त्यामुळे, रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक तसेच डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी रूग्णालय परिसरात १८ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा सुशांत भिसे या महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्यामुळे, ५ मेपासुन राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून मोर्चे, आंदोलने व निदर्शने केली जात आहेत. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वार व आवारात सुरू असलेल्या या प्रकारमुळे रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईक त्रास होत आहे. तसेच, अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या मनामध्ये नाहक भिती उत्पन्न होत आहे. आंदोलनामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊन रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला व रुग्णांच्या नातेवाईकांना ये-जा करण्याकरिता अडचण निर्माण होत आहे. तसेच, रुग्णालयाच्या कार्यात व्यत्यय येत आहे.
रुग्णालयाच्या आवारात येणार्या रुग्ण, रूग्णांचे नातेवाईक, डॉक्टर, कर्मचारी यांच्या हिताच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णास शांततामय वातावरणाची आवश्यकता आहे. म्हणून दीनानाथ मंगेशकर रुग्णलायहॉस्पीटल पुणे व सभोवतालच्या १०० मीटर परिसरात निर्बंध घालणे गरजेचे असल्याचे सांगत शर्मा यांनी प्रतिबंधात्मक आदेश घातले आहेत.
रूग्णालयाच्य १०० मीटर परिसरात रुग्णांच्या नातेवाईकाशिवाय इतरांना एकत्र जमण्यास किंवा रुग्णालयात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. रूग्णालयाच्या परिसरात दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात येत आहे.रुग्ण, रुग्णवाहिका चालक, रुग्णालयातील कर्मचारी पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच, सुरक्षा अधिकारी यांना हे आदेश लागु होणार नाहीत. रुग्णालय परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात येत आहे. रुग्णालय परिसरात कोणताही आक्षेपार्ह, वाद निर्माण होईल असा मजकूर लिहिण्यास, अगर छापील मजकूर चिकटविण्यास मनाई करण्यात आली आहे.
Related
Articles
श्रेयस अय्यरला आयसीसीकडून सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार
16 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Apr 2025
नवे शैक्षणिक धोरण येत्या शैक्षणिक वर्षापासून
17 Apr 2025
पिंपरीत १२ श्वानांवर विषप्रयोग; तीन श्वानांचा मृत्यू
16 Apr 2025
परिचारिकांच्या तत्परतेमुळे वाचले डेमू रेल्वेतील युवतीचे प्राण
16 Apr 2025
सागरिका घाटगे व झहीर खान यांच्याकडे चिमुकल्याचे आगमन

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार