बंगालला धर्माच्या आधारावर विभागू देणार नाही : ममता   

कोलकाता : वक्फ सुधारणा कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू करू देणार नाही. अल्पसंख्याक नागरिकांची आणि त्यांच्या संपत्तीची मी रक्षा करेन. बंगालला कधीही धर्माच्या आधारावर विभागू देणार नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 
 
कोलकात्यात जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलताना ममता म्हणाल्या, वक्फ कायद्याच्या अंमलबजावणीवर मुस्लिम धर्मीय नाराज आहेत, हे मला माहीत आहे. कोणीही धर्मात फूट पाडून राज्य करेल, असे मी होऊ देणार नाही.जे लोक त्यांना राजकीय चळवळ सुरू करण्यासाठी चिथावणी देतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मी बंगालला धर्माच्या आधारावर विभागू देणार नाही. इतिहास सांगतो की बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत सर्व एकत्र होते. फाळणी नंतर झाली. त्यामुळे येथे राहणार्‍यांना सुरक्षा पुरवणे हे आमचे काम आहे.दरम्यान, वक्फ विधेयकामुळे पश्चिम बंगालमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. मुर्शिदाबादमधील अनेक ठिकाणी दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. आंदोलकांनी यावेळी पोलिसांच्या गाड्या देखील पेटवल्या.  
 

Related Articles