नवीन ‘वक्फ’ कायदा धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला : राहुल   

अहमदाबाद : वक्फ (दुरुस्ती) कायदा धार्मिक स्वातंत्र्य आणि राज्यघटनेवरील हल्ला आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लवकरच ख्रिश्चन आणि शीख यांसारख्या अल्पसंख्यांकांच्या हक्कांवर गदा आणेल, असा इशारादेखील राहुल यांनी यावेळी दिला.
 
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या ८४ व्या अधिवेशनात ते बोलत होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘प्रत्युत्तर शुल्का’च्या दबावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी बळी पडले, असा आरोपही राहुल यांनी यावेळी केला. पंतप्रधान मोदी हे ट्रम्प यांना मिठी मारतानाचे छायाचित्र तुम्ही पाहिले का? असा सवाल करत राहुल म्हणाले की, त्यावेळी ट्रम्प यांनी ’आम्ही मिठी मारणार नाही, पण नवीन शुल्क लागू करू’ असे सांगितले. 

Related Articles