प्रशांत कोरटकर याला जामीन   

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपमानास्पद विधान आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याच्या प्रकरणात प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कोरटकर याला याआधी पोलिस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.  
 
शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्ये करून आणि इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन कोरटकर गायब झाला होता.२४ मार्च रोजी तेलंगणात पाठलाग करून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. कोठडीत असतानाच त्याने जामिनासाठी कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात अपील केले होते. याबाबत दोन दिवसांपूर्वी सुनावणी पार पडली होती.  बुधवारी न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी कोरटकर याचा जामीन अर्ज मंजूर केला.  इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी छावा चित्रपटावर भूमिका मांडली होती. यानंतर प्रशांत कोरटकर याने फोन करून त्यांना धमकी दिली. याबाबत सावंत यांनी फोनवरुन झालेला संवाद फेसबुकवर शेअर केला होता. तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 

 

Related Articles