रेपो दरात पुन्हा कपात   

मुंबई : भारतीय रिझर्व बँकेने बुधवारी रेपो दरात २५ बेसिस पॉइंटची कपात केली. त्यामुळे, गृह, वैयक्तिक, वाहन आणि ठेवींवरील वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. सलग दुसर्‍यांदा मुख्य व्याज दरात कपात झाल्याने रेपो दर ६ टक्क्यांवर आला आहे. आता पुढील द्वैमासिक पतधोरण ६ जून रोजी जाहीर होणार आहे.रिझर्व बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली नाणेविषयक  धोरण समितीच्या सहा सदस्यांची बैठक तीन दिवसांपासून सुरू होती. या बैठकीत समितीने रेपो दरात पुन्हा एकदा २५ बेसिस पॉइंट कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर ६.२५ टक्क्यांवरुन ६ टक्क्यांवर आला आहे. याआधी, फेब्रुवारीत पार पडलेल्या बैठकीत समितीने रेपो दरात २५ बेसिस पॉइटची कपात केली होती. त्यावेळी, रेपो दर ६.५०  वरून ६.२५ टक्क्यांवर आला होता. मे २०२० नंतरची ही पहिली कपात होती. 
 
दरम्यान, नाणेविषयक  धोरण समितीची ५४ वी बैठक ७, ८ आणि ९ रोजी पार पडली. या बैठकीनंतर मल्होत्रा यांनी याबाबतची माहिती दिली.रिझर्व बँकेने फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दर ६.५ टक्के कायम ठेवला होता. त्याआधी, कोरोना महामारीच्या काळात रेपो दरात अखेरची कपात झाली होती.चलनवाढ ४ टक्क्यांखाली राहावी, यासाठी रिझर्व बँकेने अनेक उपाययोजना केल्या होत्या. त्यात, काही प्रमाणात यश आल्याने रिझर्व बँकेने व्याज दराबाबत अनेक महिन्यांपासून घेतलेली तटस्थ भूमिका दोन बैठकांपासून बदलली आहे. 
 

 

Related Articles