नामशेष लांडग्याची जात विकसित!   

लांब पांढरे केस, मांसल जबडे असलेल्या पिल्लांचा जन्म 

वॉशिंग्टन : जनुकीय अभियांत्रिकीच्या माध्यमातून नामशेष झालेल्या एका लांडग्याची जात संशोधकांनी विकसित केली आहे. जनुकीय फेरबदल तंत्रज्ञानाचा वापर त्यासाठी केला आहे. त्या माध्यमातून लांब पांढरे केस, मांसल जबडा असलेली तीन लांडग्यांची पिल्ले जन्माला आली आहेत. अमेरिकेच्या एका गुप्त ठिकाणी त्यांचे संगोपन केले जात असल्याचा दावा केला आहे. 
 
पिल्ले तीन ते सहा महिने वयाची आहेत. त्यांच्या शरीरावर लांब पांढरे केस आहेत. मांसल जबडे आहेत. वजन सुमारे ८० पाउंड आहे. वयात आल्यावर त्यांचे वजन १४० पाऊंड होईल, अशी माहिती कोलोस्साल बायोसायन्सच्या अहवालात नुकतीच दिली आहे.नामशेष झालेली लांडग्याची जात एकेकाळी भयानक लांगडे म्हणून ओळखली जात होती. सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी ती अस्तित्वात होती. सध्या जे लांडगे आहेत. त्यांचे ते जवळचे मानले जातात. उत्तर अमेरिकेच्या
हिरवळीत ते तातडीने बागडतील, अशी परिस्थिती सध्या नक्कीच नाही, असे एका वैज्ञानिकाने सांगितले. लांडग्याची ही जात संपूर्णत: विकसित करण्यात आलेली नाही, असा दावा बफेलो विद्यापीठाचे जीवशास्त्रज्ञ व्हिन्सेंट लँच यांनी सांगितले. अर्थात ते प्रकल्पाचा भाग नाहीत.
 
लांडग्यांच्या १३ हजार वर्षांपूर्वीच्या जीवाष्मांतील डीएनएवर अभ्यास केला. ओहिओ येथील जीवाष्मातून लांडग्याचा एक दात बाहेर काढला. इडाहो येथून ७२ हजार वर्षांपूर्वीच्या लांडग्याची खोपडी शोधून काढली. सध्या ते संग्रहालयात जतन करुन ठेवले आहेत. यानंतर सध्या अस्तित्वात असलेल्या लांडग्यांचे रक्त काढून घेतले. २० वेगवेगळ्या ठिकाणी जनुकीय फेरबदल घडवून आणला. यानंतर कुत्र्याच्या अंड्यांत जनुकीय फेरबदल केलेले पदार्थ टोचले. ६२ दिवसांनंतर लांडग्यांची तीन पिल्ले जन्माला आली, असा दावा कोलोस्सेलच्या वैज्ञानिकांनी केला. अशा प्रकारे जन्माला आलेले प्राणी अधिक केसाळ असल्याचे ते म्हणाले. लांडग्यांची पिल्ले नामशेष झालेल्या लांडग्याप्रमाणेच दिसतात. मात्र, अजून त्यांना शिकार करता येत नाही, असे प्राणी तज्ज्ञ मॅट जेम्स यांनी सांगितले.

लाल लांडगे जन्माला घालणार

जंगली लांडग्याच्या रक्तापासून लाल रंगाचे लांगडे तयार करण्यात संस्था गुंतली आहे. आग्नेय अमेरिकेत त्यांचे प्रयोग सुरू आहेत. या माध्यमातून लाल रंगाचे लांडग्याची उत्पत्ती आणि त्यांची प्रजाती वाढविण्याचा त्यांचा विचार सुरू आहे. अशा प्रकाराचे संशोधन अन्य प्राण्यांवर देखील ते करणार आहेत.
 

Related Articles