E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
दीड कोटींच्या फसवणूक प्रकरण सायबर चोरांची टोळी पकडली
Wrutuja pandharpure
09 Apr 2025
पुणे
: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी ६० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणात एका सायबर चोरटयांच्या टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली. नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातील एका बँकेचा संचालकासह तांत्रिक सहायक कर्मचारी या गुन्ह्यात सामील असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
गोविंद संजय सूर्यवंशी (वय २२, रा. वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. हिंगोली), रोहित सुशील कंबोज (वय २३, रा. वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. पंजाब), बाबाराव उर्फ ओंकार भवर (वय २२, रा. वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. हिंगोली), जब्बरसिंह अर्जुनसिंह पुरोहित (वय ४५, रा. चर्होली, मूळ रा. धारावी, मुंबई), निखील उर्फ किशोर जगन्नाथ सावंत (वय ३२, रा. वाघोली, नगर रस्ता) आणि केतन उमेश भिवरे (वय २७, रा. खराडी) अशी अटक करण्यात आलेल्या सायबर चोरटयांची नावे आहेत. न्यायालयाने आरोपी सायबर चोरटयांना १२ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अनन्या गुप्ता असे नाव सांगणार्या महिलेने फिर्यादी ज्येष्ठ नागरिकांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाकडून वेळोवेळी एक लाख ६० हजार रुपये घेतले. ज्येष्ठाने आरोपींच्या बँक खात्यात पैसे जमा केले. त्यापैकी काही रक्कम
वाघोलीतील एका बँक खात्यात जमा झाल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर संबंधित बँकेतील खातेधारक भिवरे याला ताब्यात घेतले.तांत्रिक तपासात आरोपी गोविंद सूर्यवंशी, रोहित कंबोज, ओंकार भवर, जब्बरसिंह पुरोहित यांची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली.
सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ
पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, उपनिरीक्षक संदीप कदम, मेमाणे, हवालदार चव्हाण, संदीप पवार, दिनेश मरकडे, यादव, नागटिळक, सचिन शिंदे, जमदाडे, सोनुने यांनी ही कामगिरी केली.
डिजिटल मार्केटिंगद्वारे फसवणूक
आरोपी गोविंद सूर्यवंशी वाघोलीतील विघ्नेश्वर मल्टीस्टेट को-ऑप बंँकेचा संचालक आहे. रोहित कंबोज या बँकेतील तांत्रिक सहाय्यक आहे. डिगीव्हेंटरी, वननेस, रजत सेल नावाने त्यांनी डिजिटल मार्केटींग कंपनी सुरू केली होती. आरोपी सूर्यवंशी आणि कंबोज हे आभासी चलन गुंतवणूक व्यवहार करायचे. दोघांनी ही रकम जब्बरसिंह पुरोहित याच्याकडे दिली होती. बँक खात्याचा गैरवापर प्रकरणात निखिल सातव यालाही अटक करण्यात आली.
देशभरातील २९ गुन्ह्यांचा छडा
आरोपींनी सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी १०० ते १५० बँक खात्यांचा वापर केला आहे. ‘नॅशनल सायबर क्राईम पोर्टल’वर त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या राज्यात २९ गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी देशभरातील वेगवेगळ्या शहरात दाखल असलेल्या २९ गुन्ह्यांचा छडा लावला आहे. आरोपींचे दुबई, पश्चिम बंगाल, गुजरातमधील काही जणांशी लागेबांधे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प शेअर बाजारात गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणार्या सायबर चोरटयांच्या टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली. सायबर गुन्हे करताना आरोपींनी तब्बल १०० ते १५० बँक खात्यांचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे.
- स्वप्नाली शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
सायबर पोलीस ठाणे
Related
Articles
पीएमपीची ’थांबा पाटी’ लावण्याची मोहिम लवकरच
14 Apr 2025
हैदराबादचा पंजाबविरुद्ध ऐतिहासिक विजय
13 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
16 Apr 2025
निजाम संस्थानातील कायदेपंडीत काशीनाथराव वैद्य
11 Apr 2025
महामानवाला अभिवादन
15 Apr 2025
डेअरी फार्म उड्डाण पुलासमोर भुयारी मार्ग उभारणार
11 Apr 2025
पीएमपीची ’थांबा पाटी’ लावण्याची मोहिम लवकरच
14 Apr 2025
हैदराबादचा पंजाबविरुद्ध ऐतिहासिक विजय
13 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
16 Apr 2025
निजाम संस्थानातील कायदेपंडीत काशीनाथराव वैद्य
11 Apr 2025
महामानवाला अभिवादन
15 Apr 2025
डेअरी फार्म उड्डाण पुलासमोर भुयारी मार्ग उभारणार
11 Apr 2025
पीएमपीची ’थांबा पाटी’ लावण्याची मोहिम लवकरच
14 Apr 2025
हैदराबादचा पंजाबविरुद्ध ऐतिहासिक विजय
13 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
16 Apr 2025
निजाम संस्थानातील कायदेपंडीत काशीनाथराव वैद्य
11 Apr 2025
महामानवाला अभिवादन
15 Apr 2025
डेअरी फार्म उड्डाण पुलासमोर भुयारी मार्ग उभारणार
11 Apr 2025
पीएमपीची ’थांबा पाटी’ लावण्याची मोहिम लवकरच
14 Apr 2025
हैदराबादचा पंजाबविरुद्ध ऐतिहासिक विजय
13 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
16 Apr 2025
निजाम संस्थानातील कायदेपंडीत काशीनाथराव वैद्य
11 Apr 2025
महामानवाला अभिवादन
15 Apr 2025
डेअरी फार्म उड्डाण पुलासमोर भुयारी मार्ग उभारणार
11 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार