शेअर बाजार सावरला   

मुंबई : व्यापारयुद्धाच्या सावटामुळे मोठ्या प्रमाणात कोसळलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक मंगळवारी काहीसा सावरला. काल निर्देशांक  १,०८९ अंकांच्या वाढीसह ७४,२२७.०८ वर स्थिरावला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३७४.२५ अंकांनी वाढून २२,५३५.८५ वर पोहोचला.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगावर ‘प्रत्युत्तर शुल्क’ लादल्याने जागतिक बाजारपेठेत व्यापारयुद्धाचे सावट पसरले आहे. सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांत तब्बल २,२२७ अंकांनी कोसळला होता. तर, निफ्टी ७४२.८५ अंकांनी घसरला होता. याखेरीज, जगभरातील शेअर बाजारातही मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती.
 
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक परवा दहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर होता. काल पॉवर ग्रिड वगळता अन्य महत्त्वाच्या २९ कंपन्यांचे समभाग तेजीत होते. काल टायटन, बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, लार्सन अँड टुब्रो, अक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स आणि झोमॅटो यांचे समभाग सर्वाधिक वाढले.आशियाई बाजारात टोकियोचा निक्केई २२५ निदेशांक, हाँगकाँगचा हँग सेंग, शांघाय एसएसई कंपोझिट आणि दक्षिण कोरियाचा कोस्पीदेखील बर्‍यापैकी सावरला. युरोपीय बाजारातही सकारात्मकता पाहायला मिळाली.  दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर काल ०.२२ टक्क्यांनी वाढून ६४.३५ डॉलर प्रति पिंपवर पोहोले. 
 

Related Articles