E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
राजगुरुनगर तालुक्यातील भूमाफियांकडून शेतकर्यांची फसवणूक
Wrutuja pandharpure
09 Apr 2025
एसआयटी नेमून चौकशी करण्याचे महसूलमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई
, (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगर तालुक्यातील शेतकर्यांची भूमाफियांकडून फसवणूक झाली असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यामुळे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतील चर्चेनुसार, प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिली.
राजगुरुनगर तालुक्यातील शेतकर्यांची पोपट मारुती घनवट व इतरांकडून फसवणूक झाल्याबाबत चेतन राजेंद्र चिखले यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन केले होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांसह संबंधित शेतकरी यावेळी उपस्थित होते. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि संबंधित अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
राजगुरुनगर तालुक्यातील पाईट या गावासह पोपट घनवट यांची विविध नावांनी तसेच कुटुंबीयांच्या नावांनी अन्य ठिकाणी सुद्धा खरेदी केलेली जमीन आहे. त्यांनी स्थानिक शेतकर्यांच्या जमिनी घेऊन शेतकर्यांविरुद्धच अनेक तक्रारी दाखल केलेल्या आहेत. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी दमानिया यांनी यावेळी केली. जिल्हाधिकारी पुणे यांनी घनवट यांच्या नावे असलेल्या जमिनींची चौकशी केली आहे. तथापि त्यांच्या जमिनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यक्षेत्राबाहेर असण्याची सुद्धा शक्यता दिसून येत आहे.
त्यामुळे जमाबंदी आयुक्तांच्या माध्यमातून घनवट यांची राज्यात किती ठिकाणी आणि निवासी, कृषी, औद्योगिक आदी किती प्रकारच्या जमिनी असतील याबाबत त्याचप्रमाणे यासाठी आर्थिक व्यवहार कसा झाला याबाबतही चौकशी होणे आवश्यक आहे. या चौकशीची व्याप्ती कशी असावी याबाबत विभागाने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देऊन मंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणी एसआयटी नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे यावेळी सांगितले. पुणे जिल्हाधिकारी डूडी यांनी याप्रकरणी आतापर्यंत केलेल्या चौकशीनुसार घनवट यांच्या नावे असलेल्या जमिनीबाबतची उपलब्ध झालेली माहिती यावेळी सादर केली.
Related
Articles
पंजाब संघाकडून प्रियांश आर्यच्या कामगिरीचे कौतूक
11 Apr 2025
लग्नाच्या आमिषाने महिला डॉक्टरवर बलात्कार
14 Apr 2025
मावळमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
13 Apr 2025
सिंहगडावर परदेशी पर्यटकासोबत गैरव्यवहार करणार्यांवर गुन्हा
13 Apr 2025
अमेरिकेसोबत शुल्कविरहित व्यापार करार होणे अशक्य
14 Apr 2025
कर्मचार्यांचे हित जपणारी कंपनी
17 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार