नवी दिल्ली : भारतातून २०२४ ते २०२५ दरम्यान दोन लाख कोटीेपेक्षा अधिक रुपयांच्या मोबाइलची निर्यात झाली आहे, अशी माहिती केंंदीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी दिली. त्यात आयफोनचा वाटा दीड लाख कोटी रुपयांचा असल्याचे ते म्हणाले. २०२३ ते २०२४ चा विचार करता स्मार्टफोनची निर्यात ५४ टक्के अधिक झाली आहे. स्मार्टफोनची निर्यात दोन लाख कोटींची झाली. सर्वाधिक निर्यात होणार्या वस्तूंमध्ये मोबाइलचा समावेश झाला आहे. सुमारे दीड लाख कोटींचे आयफोन निर्यात झाले, असे सांगताना वैष्णव म्हणाले, देशात इलेक्ट्रॉनिक उत्पादन पाच पट वाढले आहे. गेल्या दहा वर्षांत निर्यात सहापट वाढली आहे. सुट्या वस्तूंबाबत सरकार लवकरच एक अधिसूचना काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Fans
Followers