प्रियांश आर्याच्या शतकामुळे पंजाबचा विजय   

चंढीगड : पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मंगळवारी रात्री झालेल्या आयपीएलच्या २२ व्या सामन्यात पंजाब संघाचा प्रियांश आर्या याने ४२ चेंडूत १०३ धावा करत वेगवान शतक केले. त्यामुळे पंजाबच्या संघाला चेन्नईविरुद्ध १८ धावांनी विजय मिळविता आला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २१९ धावा केल्या.
 
पंजाब संघाकडून प्रियांश आर्या याला साथ देताना मधल्या फळीतील शशांक सिंग याने नाबाद ५२ धावा केल्या. आणि अर्धशतक साकारले. मॅक्रो जेसन याने नाबाद ३४ धावा केल्या. बाकी पंजाबचे फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. श्रेयस अय्यर अवघ्या ९ धावांवर बाद झाला. तर स्टॉयनिस हा ४ धावा करून तंबूत माघारी परतला. मॅक्सवेल अवघी १ धाव काढू शकला. 
 
नेहल वढेरा याने ९ धावा केल्या. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जचा संघ यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करताना दिसत आहे. 
त्यानंतर २२० धावांचे आव्हान पेलण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघाने मात्र २० षटकांत २०१ धावा केल्या यावेळी ५ फलंदाज बाद झाले. सलामीवीर रचीन रवींद्र याने ३६ धावा केल्या त्याला मॅक्सवेल याने शानदार चेंडू टाकत प्रभासिमरन याच्याकडे झेलबाद केले. 
 
कॉन्वे हा ६९ धावांवर तंबूत माघारी परतला. रुतुराज गायकवाड याने १ धाव काढली आणि लॉकी फर्ग्युसन याने त्याला शशांक सिंगकडे झेलबाद केले.  शिवम दुबे याने ४२ धावा केल्या.  लॉकी फर्ग्युसन याने त्याचा त्रिफळा उडविला. धोनीने सामना जिंकण्यासाठी जोरदार फटके मारण्याचा प्रयत्न केला मात्र ते प्रयत्न अपयशी ठरले. विजय शंकर याने नाबाद २ धावा केल्या. 
 
संक्षिप्त धावफलक 
 
पंजाब : प्रियांश आर्या १०३, शशांक सिंग ५२, मॅक्रो जेनसन ३४, श्रेयस अय्यर ९, स्टोनिस ४, नेहल वाढेरा ९ एकूण : २० षटकांत २१९/६
चेन्नई : कॉन्वे ६९, शिवम दुबे ४२, धोनी २७, रचीन रवींद्र ३६, रवींद्र जडेजा नाबाद ९, विजय शंकर नाबाद २ एकूण : २० षटकांत २०१/५

Related Articles