यासिन भटकळसह पाच दहशतवाद्यांना मृत्युदंडाची शिक्षा   

हैदराबाद बाँबस्फोट प्रकरण

एनआयए न्यायालयाचा निकाल कायम

हैदराबाद : हैदराबाद येथील बाँबस्फोट प्रकरणी यासिन भटकळ याच्यासह पाच दहशतवाद्यांना मृत्युदंडाची शिक्षा कायम ठेवण्याचा निकाल तेलंगणा उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. बंदी घातलेल्या इंडियन मुजाहिदीन दहशतवादी संघटनेने २०१३ मध्ये बाँबस्फोट करुन १८ जणांचा बळी घेतला होता. तसेच १३१ जण जखमी झाले होते.
 
या प्रकरणी एनआयएच्या सत्र न्यायालयाने पाच जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. दोषींनी निकालाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज न्यायाधीश के. लक्ष्मण आणि पी श्री सुधा यांनी दोषींचा अर्ज फेटाळला आणि एनआयए न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे. 
 
१३ डिसेंबर २०१६ रोजी एनआयए न्यायालयाने इंडियन मुजाहिद्दीन संघटनेचा सह संस्थापक मोहम्मद अहमद सिधीबापा उर्फ यासिन भटकळ, पाकिस्तानी नागरिक झियाउद्दीन उर्फ वाकस, असादुल्लाह अख्तर उर्फ हद्दी, तहसीन अख्तर उर्फ मोनू आणि अझिज शेख यांना बाँबस्फोट प्रकरणी दोषी ठरवले होते. २१ फेब्रुवारी २०१३ रोजी हैदराबाद येथील दिलसुखनगर येथील वर्दळीच्या ठिकाणी दोन भीषण बाँबस्फोट झाले होते ते इंडियन मुजाहिद्दीन संघटनेने केल्याचे तपासात उघड झाले होते. 
 

Related Articles