हुरियत कॉन्फरन्सला आणखी तीन गटांची सोडचिठ्ठी   

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील फुटरवातवादी हुरियत कॉन्फरन्सला आणखीन तीन गटांंनी सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामध्ये जम्मू काश्मीर इस्लामिक पार्टी, जम्मू आणि काश्मीर मुस्लिम डेमोकॅटीक लीग व काश्मीर फ्रिडम फ्रंट यांचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी दिली. 
 
शहा म्हणाले, हुरियत कॉन्फरन्सपासून तीन गट दूर असल्याची बाब  म्हणजे राज्यघटनेवर जम्मू आणि काश्मीरमधील खोर्‍यातील नागरिकांचा विश्वास वाढत असल्याचे द्योतक आहे. या संदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट टाकून गटांच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. दरम्यान, शहा जम्मू आणि काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर गटांनी हुरियतपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे.  
 
शहा म्हणाले, संयुक्त आणि शक्तीशाली भारताचा दृष्टिकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. तो दृष्टिकोन अधिक बळकट होत असल्याचे आता दिसू लागले आहे. आतापर्यंत सुमारे ११ संघटनांनी हुरियत कॉन्फरन्सपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शहा यांनी सोमवारी भारत आणि पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेचा दौरा केला. सीमेवरील कथुआ येथील भारतीय लष्कराच्या चौक्यांना भेट दिली. तसेच केंद्रशासित जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षेचा आढावा देखील घेतला.
 

Related Articles