बीएसई : गुंतवणूकदारांच्या पारड्यात भरभरून माप   

भाग्यश्री पटवर्धन 

दलाल स्ट्रीट नावाने ओळखल्या जाणार्‍या रस्त्यावर उभी राहिलेली मुंबई शेअर बाजार म्हणजे बीएसई ही वास्तू लाखो लोकांची पोशिंदी आहे हेही लक्षात घ्यायला हवे. ही पार्श्वभूमी एवढ्यासाठी की ज्या लोकांनी या संस्थेवर दीर्घ काळ विश्वास ठेवला तिने त्यांच्या पारड्यात भरभरून माप टाकले आहे.गेले काही महिने शेअर बाजार अस्थिरतेच्या प्रवाहात आहे. शेअर बाजार ‘छे आत्ता नको रे बाबा’ असा सूर काही घटक आळवताना दिसत आहेत. या स्थितीत गेल्या आठवड्यात एक बातमी आली. उन्हाळ्यात अचानक थंड हवेची झुळूक यावी अशीच ती बातमी अन तीही एका भक्कम, ऐतिहासिक संस्थेविषयी. त्या संस्थेचे नाव आहे मुंबई शेअर बाजार. 
 
म्हणजे बीएसई हा स्तंभ लिहीत असताना म्हणजे मंगळवारी बाजार हजार अंशांनी कोसळला. ही संस्था केवळ बाजाराच्या दृष्टीने महत्वाची नसून सामाजिक आणि जागतिक दृष्ट्या तितकीच पथदर्शक आहे. १९९३ मध्ये दहशतवादी हल्ला पचवल्यानंतर काही तासात बाजारावरील व्यवहार सुरळीत झाल्याचे जुन्या गुंतवणूकदारांना आठवत असेल. दलाल स्ट्रीट नावाने ओळखल्या जाणार्‍या रस्त्यावर उभी राहिलेली ही वास्तू लाखो लोकांची पोशिंदी आहे हेही लक्षात घ्यायला हवे. ही पार्श्वभूमी एवढ्यासाठी की ज्या लोकांनी या संस्थेवर दीर्घ काळ विश्वास ठेवला तिने त्यांच्या पारड्यात भरभरून माप टाकले आहे. सरत्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस बीएसई च्या संचालक मंडळाने एका समभागाच्या बदल्यात दोन समभाग देण्याचा प्रस्ताव मंजूर करून सर्व घटकांना काही ना काही देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
 
२०१७ म्हणजे आठ वर्षांपूर्वी कंपनी म्हणून बीएसईचे  बाजारावर पदार्पण झाले. त्यावेळी १. ५४ कोटी शेअरची विक्री करण्यात आली होती. किमान १८ शेअरसाठी त्यावेळी अर्ज करायचा होता. किंमत होती ८०६ रुपये. ज्यांनी त्यावेळी गुंतवणूक केली त्यांचे १४,४९० रुपयांचे आताचा भाव पाहता ७८, ४०० रुपये झाले आहेत. थोडक्यात केवळ आठ वर्षात पाचपट परतावा मिळाला आहे. या परताव्यात लाभांशाची रक्कम गृहीत धरलेली नाही. ज्यांच्याकडे १८ शेअर आहेत त्यांना एकास दोन या प्रमाणे ३६ शेअर मिळणार आहेत. इथे एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की ज्यांनी दीर्घकाळ गुंतवणूक केली त्यांना हा परतावा दिसतो आहे. बीएसई चा कमाल किमान भाव (५२-ुज्ञ हळसह, ६,१३३.४० ५२-ुज्ञ श्रेु, २,११५.००) असा आहे.  शेअर बाजारात पी हळद अन हो गोरी असे झटपट पैसे मिळत नाहीत. थांबा आणि वाट पहा हेच धोरण लाभदायक ठरते. एखादे एक्सचेंज कंपनी म्हणून जेव्हा बाजारात नोंदले जाते तेव्हा त्याची ताकद किती असते हे यावरून लक्षात येते. गेल्याच आठवड्यात बीएसईचा  स्पर्धक असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्राथमिक भागविक्रीचे असलेले घोडे काहीसे पुढे सरकल्याची घडामोड वाचनात आली असेल. सध्या ज्या दोन एक्स्चेंज कंपनी बाजारात नोंदलेल्या आहेत त्यातील मल्टी  कमॉडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स -सध्या भाव ५३९० रुपये ) आहे.
 
संकटातून संधी अन आत्मनिर्भरतेची पावले
 
• अमेरिकेच्या अध्यक्षांनी आयातीवर अधिक शुल्क लावण्याचे अमलात आणल्याने जे व्यापार युद्ध जगभरच्या विविध देशात सुरु झाले आहे त्यातून एक संधी निर्माण होते आहे. त्यातील एक भारतातील कंपन्यांना मिळते आहे. केंद्र सरकारने या संधीचा पुरेपूर फायदा उठवण्याचे ठरवलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे देशातील स्टील उद्योगाकडून खरेदी करण्यास प्राधान्य. याचा थेट फायदा सेल , टाटा स्टील , जेएसडब्लू अशा कंपन्यांना यापुढे होत राहणार आहे. पुण्यातील आणखी दोन मोठ्या कंपन्यांना याचा फायदा मिळाला आहे. अतिशय महागडे   परकी चलन देऊन आयात करण्यापेक्षा देशात लष्कराला लागणार्‍या तोफा तयार करण्याचे कंत्राट भारत फोर्जला मिळाले आहे. याशिवाय आपल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीला नौदलाने २७० कोटी रुपयाचे कंत्राट युद्धनौकांना लागणारी इंजिने उत्पादन करण्यासाठी दिले आहे. एकीकडे बाजारात घसरण आणि अनिश्चितता असली तरी दुसरीकडे विविध पातळ्यांवर देशाची उद्योगांना अधिक  संधी देण्याचे धोरण अमलात येते आहे. यामुळे परकी चलनाची बचत होते अन् रोजगार उपलब्धताही वाढते. आत्मनिर्भरतेची ही पावले गुंतवणूकदारांनाही आश्वस्त करत आहेत.  पुढील  काळात स्टील , संरक्षण उत्पादन या क्षेत्रांतील कंपन्यांची चांगली कामगिरी दिसेल यात शंका नाही.

Related Articles