आरोग्य विमा योजनेत मिळवा अतिरिक्त कवच   

भास्कर नेरुरकर प्रमुख - आरोग्य प्रशासन संघ, बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स

वैद्यकीय आणीबाणीत आर्थिक फटका बसू शकतो. सर्वसाधारण आरोग्य विमा तुमच्या सर्व गरजा पूर्ण करू शकत नाही. अतिरिक्त किंवा पर्यायी कवच नाममात्र किंमत मोजून मिळवता येते. जे एखाद्याने त्याच्या विमा पॉलिसी योजनेत जोडले पाहिजे. अशा विमा कवचाबाबत... 
 
खोलीची भाडे माफी
 
बहुतेक आरोग्य विमा पॉलिसींमध्ये खोलीचे भाडे ठराविक असते. विम्याच्या रकमेच्या १-२% पर्यंत मर्यादित असते. जर विम्याची रक्कम पाच लाख असेल आणि खोली भाड्याची मर्यादा १% असेल, तर याचा अर्थ खोली भाड्याची मर्यादा पाच हजार रुपये असते. जर एखाद्या व्यक्तीने खोलीच्या भाड्याची मर्यादा ओलांडली, तर दावा निकाली काढताना त्या प्रमाणात वजवट (’प्रपोर्शनेट डिडक्शन्स’ ) केली जाते. याचा अर्थ विमा कंपनी सर्व ’संबंधित वैद्यकीय खर्चा’मधून अतिरिक्त खोली भाड्याची रकम कमी करेल. विम्यात खोली भाडे माफी हवी, असे  स्वीकारले तर पॉलिसीमधून खोली भाड्याची मर्यादा काढून टाकली जाते आणि खोलीच्या भाड्याचा वास्तविक खर्च दिला जाईल.
 
हॉस्पिटल डेली कॅश
 
नावाप्रमाणेच, हे कवच विमाधारक  रुग्णालयात असे पर्यंत प्रत्येक दिवसाला पूर्व-निर्धारित रक्कम  देते.  दररोज मिळणारी रक्कम साधारणपणे ५०० ते  २ हजार ५०० रुपयांपर्यंत असते. विमा कंपनीचे कवच २०-३० दिवस किंवा त्याहूनही अधिक उपलब्ध असेल. पारंपारिक आरोग्य विमा संरक्षणाच्या विरूद्ध, जे खर्च झाले त्या खर्चाची परतफेड करते. ही पॉलिसी खर्च कितीही असो, एक सेट भत्ता देते. शिवाय, अति दक्षता विभागामध्ये प्रवेश घेतल्यास, दैनिक रोख भत्ता मर्यादा काही दिवसांसाठी दुप्पट केला जातो.(पॉलिसीमध्ये परिभाषित केल्याप्रमाणे). हे कवच जी काही अतिरिक्त रक्कम देते ती विमाधारक त्यांच्या सोयीनुसार वापरू शकतो. पर्यायाने त्याच्या  खिशाबाहेरील खर्च कमी होण्यात मदत मिळते. 
 
बाह्य-रुग्ण खर्चासाठी कवच  
 
क्लिनिकचा सल्ला, पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी  तपासणी होणार्‍या खर्चावर कवच मिळते, तसेच वार्षिक प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीबरोबर काही विमा कंपन्या दंत सल्ला आणि उपचार तसेच आहार सल्ला यासाठी कवच देतात. विस्तीर्ण संरक्षण मिळविण्यासाठी ते आवश्यक आहे.
 
पूर्वीपासूनच्या रोगावर कवच 
 
थायरॉईड, उच्चरक्तदाब, मधुमेह, दमा इत्यादी आजार हे पूर्वीपासून अनेकांना असतात. जे २-४ वर्षांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर पॉलिसीत संरक्षित होतात. तथापि, काही योजना पहिल्या दिवसापासून अशा आजारांना नाममात्र किमतीत कवच देतात. जर एखाद्याला अशा आजारांनी ग्रासले असेल तर त्याने असे विमा कवच घ्यावे. कारण पॉलिसीत सुरुवातीपासून विमाधारकाला वरील आजारांसाठी सुरक्षा कवच मिळते.
 
गंभीर आजारात कवच  
 
जीवनशैलीतील बदलामुळे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार आणि तीव्र श्वसनविकार यांसारखे गंभीर आजार होतात. अशा आजारासाठी पूरक आरोग्य विमा पॉलिसी असणे महत्त्वाचे आहे. पॉलिसीमध्ये कर्करोग, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, न्यूरो स्थिती, मूत्रपिंड निकामी होणे, मुख्य अवयव प्रत्यारोपण इत्यादीसारख्या गंभीर आजारांचा समावेश आहे. आजाराचे निदान झाल्यावर विमाकर्ता एकरकमी पे-आउट करतो. कंपनीनुसार आजाराचे कवच असते. जीवघेण्या गंभीर आजाराचा सामना करणार्‍याच्या नातेवाईक यांनी असा विमा घेण्याचा विचार करावा. 
 
ऐच्छिक कवचाची निवड केव्हा करावी 
 
प्रत्येक विमा पॉलिसीमध्ये अद्वितीय अंतर्भूत कवच असतात. प्रथम काळजीपूर्वक कवचाची व्याप्ती समजून घेण्यासाठी तुमच्या पॉलिसीमध्ये काय समाविष्ट आहे, काय नाही याचे पुनरावलोकन करा. त्यानंतर, आवश्यक अतिरिक्त कवच ओळखण्यासाठी आपल्या गरजांचे मूल्यांकन करा. लक्षात ठेवा, चांगल्या कवचासाठी थोडी अधिक आगाऊ गुंतवणूक करणे चांगली कल्पना असते. जेव्हा तुम्हाला दावा करण्याची गरज असते तेव्हा ते तुमचे बरेच पैसे वाचवू शकते.

Related Articles