धायरीत रस्त्याची अवस्था बिकट   

धायरी: पुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीतील धायरी सिंहगड रस्ता परिसरात डीपी रस्ते करण्यात येणार आहेत. मात्र पालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या नविन हद्दीतील धायरी येथे पालिका डीपी रस्ते करणार नाही अशी भूमिका पालिकेच्या बांधकाम विभागाने घेतली त्यामुळे आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांच्यासह नागरिकांनी आंदोलन करून अधिकार्‍यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा विकास आराखडा पीएम आरडी ने मंजूर केले आहे. त्याला महापालिकाची मंजूरी नाही असे पत्र पालिकेच्या बांधकाम विभागाने आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांना दिले आहे. 
 
आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, धायरी येथे सावित्री मंगल कार्यालयापासून  ३० मी. डी.पी. रस्ता, काका चव्हाण बंगला ते श्री. कंट्रोल चौक, आर.पी. रस्ता, हायब्लिस सोसायटी ते लक्ष्मी लॉज नन्हे रस्त्या पर्यतचा प्रस्तावित डी.पी. रस्ता. धायरी गाव, बेनकर मळा या भागातील स.नं. ६,७ व ८ मधून ओढ्याला लागून असलेला ६० फुटी प्रस्तावित आर. पी. रस्ता असे चार डीपी रस्ते मंजूर करण्यात आले आहेत. काही भागात रस्त्याचे  काम अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहेत. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या धायरी गावाच्या प्रारूप विकास योजना आराखडा तयार करण्याचे काम नगर रचना विभााने  सुरू केले आहे. मात्र  त्याला  अद्याप मंजूरी देण्यात आली नाही. त्यामुळे नव्याने समाविष्ट गावांतील दोन रस्ते करता येत नसल्याचे बांधकाम विभागाने म्हटले आहे.
 
पथविभागाने जुन्या व नविन हद्दीतील चारही डीपी रस्त्यांच्या कामांना गती दिली आहे. परंतु बांधकाम विभागाच्या भूमिकेमुळे संतप्ताची लाट पसरली आहे असे आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी सांगितले. यावेळी निलेश दमीस्टे  संदीप विठ्ठल पोकळे संतोष चौधरी अमर खेडेकर उपस्थित होते.
 

Related Articles