पाकिस्तानात आठ दहशतवादी लष्कराच्या कारवाईत ठार   

खैबर पख्तुनख्वा प्रांतात घुसखोरी

पेशावर : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात लष्कराबरोबर उडालेल्या चकमकीत आठ अफगाणी दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. चार दहशतवादी जखमी झाल्याचे सांगण्यात आले. 
 
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर पाकिस्तानच्या हद्दीत खैबर पख्तुनख्वा प्रांत आहे. या प्रांताच्या उत्तर वझिरास्तान जिल्ह्यात अफगाणिस्तान सीमेतून काही दहशतवादी पाकिस्तान हद्दीत शिरण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा चकमक उडाली. दरम्यान, गेल्या कही दिवसांपासून बलुचिस्तानातील बंडखोर आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतातील दहशतवादी प्रामुख्याने तेहरीक ए तालिबान पाकिस्तान दहशतवादी संघटनेकडून वारंवार त्या त्या परिसरात हल्ले करत आले आहेत.  अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार आल्यानंतर नोव्हेंबर २०२२ पासून पाकिस्तानी हद्दीत दहशतवादी हल्ले वाढत चालले आहेत. त्यापैकीच हा एक घुसखोरीचा प्रकार झाल्याचे मानले जात आहे. ५ आणि ६ एप्रिलच्या मध्यरात्री अफगाण सीमेवरून काही दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत हेोेते. उत्तर वझिरीस्तानच्या हासन खेल परिसरात त्याना रोखण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा गोळीबारात आठ अफगाणी वंशाचे दहशतवादी ठार तर चार जखमी झाले आहेत. बंदी घातलेल्या तेहरीक ए तालिबान पाकिस्तान संघटनेचे ते दहशतवादी आहेत, असा दावा पाकिस्तानच्या लष्कराने केला. 
 

Related Articles