सुश्रुत धर्माधिकारी होणार केरळचे मुख्य न्यायाधीश   

नवी दिल्ली : मध्य प्रदेशाच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुश्रुत अरविंद धर्माधिकारी यांची केरळ उच्च न्यायालयात बदली करावी, अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृदांनी केली आहे. त्यामुळे ते केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.  
 
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्चाखालील न्यायवृदांची गेल्या महिन्यात दोनदा यााबाबत बैठक झाली. तिसरी बैठक ३ एप्रिल रोजी झाली होती. २० आणि २४ मार्च रोजी बैठक झाली होती. ३ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत धर्माधिकारी यांची बदली केरळमध्ये करण्याची शिफारस पुन्हा करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर देखील प्रकाशित करण्यात आली आहे.

Related Articles