E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
हेलिकॉप्टरमधून उडी घेतली, पण पॅराशूट उघडलेच नाही...
Samruddhi Dhayagude
07 Apr 2025
वायुसेनेच्या अधिकाऱ्याचा हृदयद्रावक अंत
आग्रा : भारतीय वायुसेनेच्या आकाश स्कायडायव्हिंग संघाचे पॅरा जंप प्रशिक्षक जखमी झाले असून त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शनिवारी (५ एप्रिल) ही धक्कादायक घटना घडली. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे डेमो ड्रॉप दरम्यान ते जखमी झाले. त्यांनी हेलिकॉप्टरमधून उडी घेतली, पण काही बिघाडामुळे त्यांचे पॅराशूट वेळेवर उघडू शकले नाही. यामुळे ते थेट खाली पडले, ज्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना शनिवारी 'डेमो ड्रॉप' दरम्यान रात्री साडे नऊच्या सुमारास घडली, जेव्हा ४१ वर्षीय वॉरंट ऑफिसर रामकुमार तिवारी यांनी हेलिकॉप्टरमधून उडी मारली आणि पॅराशूट न उघडल्यामुळे ते थेट जमिनीवर पडले. काही तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे पॅराशूट उघडले नाही, त्यामुळे हा अपघात झाला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. लष्करी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
या प्रकरणा बाबत सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक भोसले यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, वॉरंट ऑफिसर रामकुमार तिवारी यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांना रात्री १२ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून मिळाली. पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. वॉरंट ऑफिसर रामकुमार तिवारी यांच्यासाठी, भारतीय हवाई दलाने आपल्या एक्स अकाऊंटवर लिहिले की, "आयएएफच्या आकाश गंगा स्कायडायव्हिंग टीमच्या पॅरा जंप प्रशिक्षकाचे आज आग्रा येथे डेमो ड्रॉप दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे निधन झाले. वायुसेना या नुकसानीबद्दल दु:ख व्यक्त करते आणि कुटुंबाप्रती शोक व्यक्त करते. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे."
सपा प्रमुख अखिलेश यादव यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या घटनेसोबतच त्यांनी फ्लाइट लेफ्टनंटच्या मृत्यूचाही उल्लेख केला. त्यांनी लिहिले, "प्रथम, गुजरातमधील जामनगर येथे लढाऊ विमानाच्या अपघातामुळे फ्लाइट लेफ्टनंटचा मृत्यू झाल्याची बातमी आणि आता पॅराशूट न उघडल्यामुळे आग्रा येथे हवाई दलातील एका अधिकाऱ्याचा मृत्यू ही अत्यंत दुःखद बाब आहे. सुरक्षेबाबत केलेली तडजोड जीवघेणी ठरते. या प्रकरणांमध्ये, प्रत्येक स्तरावर गुणवत्तेची सखोल आणि गंभीर तपासणी व्हायला हवी, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये."
Related
Articles
युरोपीय विमान वाहतूक संघांचे सदस्य पाकिस्तान दौर्यावर
07 Apr 2025
दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू
06 Apr 2025
खासदार कुलकर्णी यांनी स्वपक्षाच्याच पदाधिकार्यांचे टोचले कान
08 Apr 2025
नवजात बालकांच्या डोळ्यांची तपासणी ही आरोग्यदायी आयुष्याच्या सुरुवातीसाठी महत्त्वपूर्ण
07 Apr 2025
कोणत्या देशांकडून काय आयात करते अमेरिका?
04 Apr 2025
ट्रम्प यांचा ‘टॅरिफ’ धक्का (अग्रलेख)

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
5
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
6
अभिनेते मनोज कुमार यांचे निधन