जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ   

जम्मू : वक्फ (दुरुस्ती) कायद्यावर चर्चा करण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सने मांडलेला स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण न्यायप्रष्टि असल्याचे सांगून फेटाळला. त्यावरुन, सभागृहात मोठा गदारोळ झाला. तसेच, वक्फ विधेयकाच्या प्रति सभागृहात फाडण्यात आल्या. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. नॅशनल कॉन्फरन्सने तन्वीर सादिक यांनी वक्फ (दुरुस्ती) कायद्यावर चर्चा करण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सचे झीर गुरेझी आणि तन्वीर सादिक यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. भाजपचे सुनील शर्मा यांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध केला. तसेच, प्रश्नोत्तर सत्राची मागणी केली.  विधानसभा अध्यक्ष अब्दुल रहीम राथेर यांनी हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे आणि त्यामुळे त्यावर चर्चा करता येणार नाही, असे सांगितले. नियम ५८ नुसार, कोणताही विषय न्याय प्रविष्ट असेल तर स्थगन प्रस्ताव आणता येत नाही. तसेच, हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे आपण स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा करू शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

Related Articles