गाझामधील नवीन सुरक्षा कॉरिडॉरमध्ये इस्रायली सैनिक   

जेरुसलेम : दक्षिण गाझामध्ये नव्याने स्थापन झालेल्या सुरक्षा कॉरिडॉरमध्ये इस्रायली सैन्य तैनात करण्यात आले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी बुधवारी हमास दहशतवादी गटावर दबाव आणण्यासाठी नवीन मोराग कॉरिडॉरची घोषणा केली. त्यावेळी हमास दहशतवाद्यांना दक्षिणेकडील राफा शहर रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. 
 
इस्रायलने जारी केलेल्या लष्करी निवेदनात म्हटले आहे की, कॉरिडॉरमध्ये ३६ व्या तुकडीचे सैन्य तैनात करण्यात आले आहे. किती सैन्य तैनात करण्यात आले होते किंवा कॉरिडॉर नेमका कुठे होता हे लगेच स्पष्ट झाले नाही. 
 
मोराग हे ज्यू वस्तीचे नाव आहे. एकेकाळी राफा आणि खान युनिसच्यामध्ये ही वस्ती होती. दरम्यान, इस्रायली माध्यमांनी प्रकाशित केलेले नकाशे पूर्वेकडून पश्चिमेकडे एका अरुंद किनारपट्टीच्या रुंदीचा नवा कॉरिडॉर दाखवतात. नेत्यान्याहू म्हणाले की, हा दुसरा फिलाडेल्फिया कॉरिडॉर असेल.
 

Related Articles